ऊसाला चार हजार शंभर रु भाव २१ नोव्हेंबर पर्यंत जाहीर न केल्यास गंगापूर कायगांव येथील कारखान्याच्या सर्व गट कार्यालयांना टाळे टोकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.


गंगापूर (प्रतिनिधी) चार हजार शंभर रु भाव जोपर्यंत कारखानदार देत नाही तोपर्यंत उसाला कोयता लागू द्यायचा नाही गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा निर्धार.


ऊसदराच्या बाबतीत गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कारखानदार यांच्यामध्ये भावाच्या बाबतीत संघर्ष चालु आहे,क्रांती भूमी रामेश्वर मंदिर येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस परिषद १० नोव्हेंबर रोजी झाली असून ४१०० रु भाव जोपर्यंत कारखानदार देत नाही तोपर्यंत उसाला कोयता लागू द्यायचा नाही.तसचे जो कुणी आपले शेत मोकळे करण्यासाठी शेतकऱ्याच्या विरोधात जाऊन ऊस तोडणी करत असेल त्याला समज देऊन,तोडनी बंद करण्यासाठी भाग पाडून शेतकरी हिताच्या बाबतींत भूमीका घेण्यास भाग पाडू.


पश्चिम महाराष्ट्र मधील तसेच मराठवाड्यातील कारखानदारांनी भाव जाहीर करावा नसता २१ नोव्हेंबर राजी प्रादेशिक साखर संचालक तसेच सर्व कारखानदार याचे कायगाव येथील सर्व गट ऑफिस यांना टाळे टोकण्याचा ठराव कायगाव येथील ऊस परिषदेत शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके यांनी भूमिका मांडतांना कारखानदार यांना दिला.


ज्या वेळेस frp ठरवताना उसाचे उत्पादन हेक्टरी १०० टन धरुन ३१५० रु frp दिला जातो पण अस्मानी संकट आले असतांना दुष्काळी परिस्थिती असतांना उत्पादन कमी झाले असतांना,उसाचे हेक्टरी ६० टन उत्पादन आले असतांना frp डबल धरून ४१०० रु भाव देण्यात यावा या बाबत एक मताने ठराव झाला असून,जोपर्यंत ४१०० रु भाव मिळत नाही किंवा कारखानदार भाव जाहीर करत नाही तोपर्यंत कोणत्याही कारखान्याला ऊस जाऊ द्यायचा नाही ही भूमिका शेतकरी संघटनेची,कृती समितीची असून रंगराजन समितीच्या शिफराशी नुसार ७०/३० फाॅरमुल्या नुसार इथोनॉल, स्पिरीट,माॅलीशीस,बग्यास,अल्कोहोल,यांची किंमत ग्राह्य धरून उसाला भाव देण्यात यावा.दुष्काळी परिस्थिती असल्याने लाईट बिल,बॅकेंची वसुली,पत संस्थेची वसुली,कर्ज वसुली थांबवून सरसकट कर्ज माफी या बाबत ठराव करण्यात आला.
उत्पादन खर्च अधिक ५०℅नफा ग्राह्य धरून शेतकऱ्यांना उसाला भाव मिळाला पाहिजे ही ऊस उत्पादक शेतकरी यांची भूमिका असून या ऊस परिषदे साठी विनोद काळे,कल्याण गायकवाड,महेश गुजर,राहुल ढोले,विठ्ठल कुंजर,ॲड विक्रम परभने,सुनिल बोराटे,सुभाष माने,नंदकिशोर बागुल,गजानन गायकवाड,हरिभाऊ डव्हान,सुरेश चव्हाण,सोमनाथ गवारे,खंडू भरपूर,रमेश मिसाळ,मुकेश कोरडकर, मच्छिंद्र कोरडकर,आप्पासाहेब निरफळ,रामेश्वर गायकवाड,रवींद्र मनाळ आदी शेतकरी मोठया संख्येने उपस्थित व्होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!