आमदार प्रशांत बंब यांनी गंगापूर तालुक्यात पावसाने नुकसान झालेल्या पिकांची अधिका-यांसमवेत पाहणी केली


गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यात रविवारी रात्री जोरदार वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेले पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळे आहे. मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी आमदार प्रशांत बंब यांनी टोकी शिवारात पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. गंगापूर तालुक्यासह वाळूज महानगर परिसरात रविवारी रात्री जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे टोकी, शहापूर बंजर, खोजेवाडी, आसेगाव, आंबेगाव आदी गावातील शेतकऱ्यांचा वेचणीला आलेला कापूस भिजल्याने कापसाच्या वाती होऊन मका व ज्वारीचे पिके भुईसपाट झाले आहेत. मंगळवारी आमदार प्रशांत बंब यांनी टोकी शिवारात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी तहसीलदार सतीश सोनी, तालुका कृषी अधिकारी बापूराव जायभाये, मंडळ अधिकारी दिपाली गाडे, ज्ञानेश्वर दुर्गुडे, प्रशांत गोसावी, तलाठी गंगाधर जगताप, कृषी सहाय्यक वर्षा हिवाळे आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार बंब यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधून उपस्थित अधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने याचा अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी शिवनाथ मालकर, के.डी.रावते, शरद रावते, कैलास चक्रे, भगवान कात्रे आदींसह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!