शेंदुरवादा येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता कामाचे उदघाटन पोटे यांनी केले

गंगापूर (प्रतिनिधी) शेंदुरवादा येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता कामाचे उदघाटन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उप तालुका संघटक विष्णु पोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
गावठाण अंतर्गत वास्तव्यास असणाऱ्या या भागातील नागरिकांना वास्तव्यास २५ वर्षे पूर्ण होऊन सुध्दा या ठिकाणी आज पर्यंत रस्ताच नसल्याने या भागातील नागरिकांनी विष्णु पोटे यांच्याकडे मागणी केली. त्यानंतर लगेचच पोटे यांनी ही बाब विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर लगेचच श्री.दानवे यांनी जन सुविधा योजने अंतर्गत सिमेंट रस्त्यासाठी ४ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला. या भागातील नागरिकांना आज पर्यंत कुठल्याच लोकप्रतिनिधीनी न्याय दिला नाही.
परंतु या रस्त्याच्या कामासाठी आमदार अंबादास दानवे यांनी विशेष सहकार्य केले असुन यांच्या सह गावाच्या विकास कामांसाठी सतत प्रयत्न करणारे विष्णु पोटे यांचे नागरिकांनी आभार मानले. व गावातील आवश्यक असणा-या समस्या विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.असे २९ मे रोजी उदघाटन प्रसंगी सांगितले या प्रसंगी ज्ञानेश्वर सोलट, गणेश रांजणे सह ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!