शिंदे गटाच्या गद्दारांविरोधात निष्ठावंत शिवसेनेचा एल्गार.. निवडणूक लागताच सामान्य शिवसैनिक गद्दारांना धडा शिकवणार– विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

शिंदे गटाच्या गद्दारांविरोधात निष्ठावंत शिवसेनेचा एल्गारनिवडणूक लागताच सामान्य शिवसैनिक गद्दारांना धडा शिकवणार– विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

शिवगर्जना संपर्क मोहीमे प्रसंगी पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

राज्यातील जनतेला मागील एका वर्षात कशा पद्धतीने राजकारण झाले याचे भान आहे.भारतीय जनता पक्षाने धन, बळाचा वापर करून काही गद्दार आमदारांना पैशाचे आमिष दाखवून महाविकास आघाडीचे सरकार पाडले.पिठलं भाकर खाऊन जीवन जगणाऱ्या सामान्य शिवसैनिकांना व जनतेला ही गद्दारी आवडली नसून ते फक्त निवडणूक लागण्याची वाट बघत आहे.निवडणुकीत सामान्य शिवसैनिक गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही
असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त जिल्हात शिवगर्जना संपर्क मोहिमेस सुरुवात झाली असुन आज गंगापूर तालुक्यातील वाळुज व शेंदूरवादा येथे राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थानिक पदाधिकारी नागरिकांशी संवाद साधला तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेतल्या.

यावेळी दानवे यांनी शिवसेना पक्षाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल जनतेसमोर वाचून दाखवत यातील तांत्रिक बाबी निदर्शनास आणून दिल्या.
वाळूज व शेंदूरवादा येथिल ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या अंबादास दानवे यांनी समस्या जाणून घेतल्या.येथिल शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, सततधार पाऊस,गारपीट यामुळे मोठे नुकसान झालेले असुन बँकेतून पीक कर्ज काढण्यासाठी सुद्धा अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात स्थानिक प्रशासकीय अधिकारी व बँक मॅनेजर यांना हे प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सांगळे, अविनाश पाटील,तालुकाप्रमुख दिनेश मुथा,महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभाताई जगताप, उपजिल्हा संघटक लता पगारे, तालुका संघटक अर्चना सोमासे, उपतालुकाप्रमुख लक्ष्मणजी सुपेकर, विभाग प्रमुख कारभारीजी दुबिले, उत्तम म्हस्के,शाखाप्रमुख नामदेव तुपे,गटप्रमुख पांडू जंजाळे,युवासेना उपविभाग प्रमुख शरद गवांडे,जेष्ठ शिवसैनिक कैलास म्हस्के, कल्याण बोरुडे, सुरेंद्र सूर्यवंशी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गंगापुर तालुक्याच्या दौऱ्या दरम्यान खरीप हंगाम पूर्व मशागत करत असलेल्या शेतकरी युवराज रघुनाथ माळे यांची भेट घेतली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!