महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची गंगापूर तालुका कार्यकारिणी घोषित.तालुकाध्यक्षपदी कल्याण राऊत,सरचिटणीस तिलकेश्वर सिरसाठ

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची गंगापूर
तालुकाध्यक्षपदी कल्याण राऊत,सरचिटणीस तिलकेश्वर सिरसाठ,कार्याध्यक्ष सागर घोणशेट्टे,कार्यकारी अध्यक्ष सुनील साळवे,कोषाध्यक्षपदी
प्रभाकर बावीस्कर यांची वर्णी. संजय खरात सचिव.अभिषेक शहाणे कार्यालय चिटणीस.

गंगापूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची गंगापूर तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून त्यात सर्वानुमते तालुका नेतेपदी कडूबा हारदे,दिगंबर औसरमल,विलास वाघ,रघुनाथ खजीनदार,तालुकाध्यक्षपदी कल्याण राऊत,सरचिटणीस तिलकेश्वर सिरसाठ,कार्याध्यक्ष सागर घोणशेट्टे,कार्यकारी अध्यक्ष सुनील साळवे,कोषाध्यक्षपदी
प्रभाकर बावीस्कर,सचिव
संजय खरात,कार्यालय चिटणीस अभिषेक शहाणे यांची वर्णी लावण्यात आली आहे.
राज्य संपर्कप्रमुख मधुकर वालतुरे यांच्या विशेष उपस्थितीत विष्णू बोरुडे,रामभाऊ चोरमले,जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे,संजय भडके,जालींदर चव्हाण,लक्ष्मण उबाळे,अंकुश जाधव,संपत शिंदे,साईनाथ कबाडे यांच्या उपस्थितीत रविवार ३१ रोजी शिक्षक नेते शिवाजीराव पाटील अध्यापक महाविद्यालय भेंडाळा येथे घेण्यात आलेल्या निवड बैठकीत वरील निवडी जाहीर करण्यात आल्या.


नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कार्यरत राहून शिक्षक संघाच्या बळकटीसाठी प्रयत्नरत रहावे असे प्रतिपादन राज्य संपर्कप्रमुख मधुकर वालतुरे यांनी केले.
विस्तृत कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
उपाध्यक्ष : दादासाहेब गावंडे,कैलास म्हस्के,चुन्नीलाल जैस्वाल,राजेश जाधव,कैलास शेळके,विकास शिंदे,प्रदीप पाटील,मोहसीन सय्यद

प्रसिध्दीप्रमुख : संदीप काळे,सदाशिव बागडे,लक्ष्मीकांत उदावंत,सिध्देश्वर स्वामी,लक्ष्मण कळसकर

सह सरचिटणीस : सोपान पवार,व्यंकटेश श्रीनेवार,
सहकार्याध्यक्ष : मनोज खानझोडे,प्रमोद चौधरी,
सहकोषाध्यक्ष : नसीर शेख,डॉ.बी.बी.राठोड,
सहसचिव : नितीन तागडे,निलेश कहाटे,

संपर्कप्रमुख : दिनेश अभंग,सु.सु.काळे,गणेश सावळे,लक्ष्मण निकम,भाऊसाहेब मोरे

मार्गदर्शक : हरिभाऊ गांगर्डे,कडू बडोगे,सुभाष मोरे,सुनील मंडलिक,शिवाजी ढाकणे,भानुदास नेरपगार,जफर पठाण,सोमनाथ भाकरे,दिलीप आळंजकर

सल्लागार : गुलचंद पिठले,

संघटक : शरद शिंदे,देविदास देसले,आबाजी सोनवणे,प्रवीण कोल्हे,कल्याण डमाळे,सुनील उबाळे,किरण फिरके

मिडीयाप्रमुख : कुंदनसिंग राजपूत,संदीप मनाळ,ज्ञानेश्वर जुंजे,संदीप तांबट,सुभाष डुबे,चांगदेव आघाडे

सहसंघटक : अशोक गरड,अंगद मोटे,रामदास वाघ,दिलीप धर्माधिकारी,कडूबाळ निकम अरविंद शिंदे,

चिटणीस : गणेश शेडाळे,गोविंद नजन,ज्ञानेश्वर पवार,रवींद्र शिनगारे,मधुकर इंगळे,तुळशीदास पाठे,भाऊसाहेब गावडे,

यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.सूत्रसंचालन सचिन वालतुरे यांनी केले तर आभार प्रदीप जाधव यांनी मानले.यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!