धक्कादायक.. शेतीसाठी बायकोनेच केला विहीरीत ढकलून आपल्या नव-याचा खुन… आत्महत्याचा केला बनाव.. शिवुर पोलीसांनी ७२ तासात उलगडले गुढ

धक्कादायक.. शेतीसाठी बायकोनेच केला विहीरीत ढकलून आपल्या नव-याचा खुन… आत्महत्याचा केला बनाव.. शिवुर पोलीसांनी ७२ तासात उलगडले गुढ

वैजापुर (प्रतिनिधी) शेतीतील मुलीच्या

हिस्स्यासाठी बायकोने नव-याला विहीरीत ढकलुन देवुन हत्या केली … नव-याने विहीरीत आत्महत्या केल्याचा केला बनाव.. शिवुर पोलीसांनी ७२ तासात उलगडले हत्येचे गूढ

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार १३ ऑगस्ट रोजी सांयकाळी ६.३० वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील पोलीस ठाणे शिवुर हद्यीतील हिलालपुर पारोळा शिवारातील शेत गट क्रमांक २२८ मध्ये सुदाम राघु झिंजुर्डे वय ५५ वर्षे यांनी त्यांचे शेतातील विहीरीत आत्महत्या केली असल्याचे त्यांचे पत्नी कमलाबाई सुदाम झिंजुर्डे यांनी शिवुर पोलीसांना माहिती दिली होती मिळालेल्या माहितीवरून लागलीच शिवुर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे पथकाने घटनास्थळी धाव घेवुन विहीरीतुन सुदाम यांचा मृतदेह वरती काढुन घटनास्थळाची सुक्ष्म बारकाईने पाहणी केली. यावेळी मयताची पत्नी कमलबाई झिंजुर्डे हीने तिचा पती सुदाम झिंजुर्डे यांने विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची पोलीसांना माहिती देत होती.या घटनेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकमनीष कलवानिया, यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी महक स्वामी, व सपोनि संदीप पाटील यांनी मयत सुदाम झिंजुर्डे यांचे आत्महत्येच्या घटनेच्या अनुषंगाने परिस्थीतीचा संशय आल्याने पोलीसांनी मयत हिची पत्नी कमलबाई झिजुर्डे हिची कसोशिने चौकशी केली असता पोलीसांना उडवा-उडवीची उत्तरे देवु लागल्याने तिच्यावर अधिक संशय बळावल्याने तिला विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली असता तिने सांगितले कि, मृत सुदाम यांची पहिली पत्नी ही साधारण १५ वर्षापुर्वी मयत झाली आहे आणि तिला दोन मुले आहेत. त्यामुळे त्याने त्यावेळेस कमलाबाई हिचेशी लग्न केले परंतु तिला ब-याचा कालावधी पर्यंत अपत्य न झाल्याने तिच्या पतीने त्यांची शेत जमीन ही पहिल्या पत्नीच्या मुलांचे नावाने केली होती. परंतु यादरम्यान साधारण तीन ते चार वर्षापुर्वी कमलबाई हिला सुध्दा मुलगी झाली. त्यामुळे तिने मयत सुदाम हयाचे मागे तगादा लावला कि मला व माझ्या मुलीच्या भविष्यासाठी जमिन आमच्या नावावर पाहिजेत. यावरून त्यांच्यात ब-याच वेळा भांडण होवुन वाद होत होते. याबाबत कमलबाई हिच्या मनात कायम संशय आणि पती सुदाम यांचे विषयी रागाची भावना निर्माण झाली होती.

असा झाला खुनाचा उलगडा….. याचकारणावरून त्यांच्यात १३ रोजी संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास वाद होवुन मोठयाप्रमाणावर भांडण झाले त्यांच्या भांडणामध्ये ते त्यांचे शेतवस्तीवरिल असलेल्या विहीरीजवळ भांडत गेले असता पत्नी कमलबाई हिला पती विषयी असलेला राग अनावर झाल्याने तिने पती सुदाम झिजुर्डे यांना विहीरीत ढकलुन दिले. पती सुदाम हा विहीरीबाहेर येण्याचा अतोनात प्रयत्न करत असतांना तिने विहीरीचे काठावर उभे राहुन पतीच्या अंगावर जोरात दगडांचा मारा करून त्यास विहीरीत ढकलुन देवुन दगड मारून ठार मारले. व पतीने विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा खोटा बनाव केला असा कबुली जबाब दिला आहे.
शिवुर पोलीसांनी अत्यंत कसोशिने शास्त्रशुध्द पध्दतीने तपास करुन यातील मयताचे आत्महत्याचे गुढ उकलुन काही तासातच आरोपी मयतांची पत्नी कमलबाई सुदाम झिजुंर्डे वय ४८ वर्षे रा. हिलालवाडी , पारोळा शेतवस्ती, हिला हत्येच्या आरोपाखाली जेरबंद केले आहे. तिच्या विरूध्द पोलीस ठाणे शिवुर येथे भादंवी कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नमुद कारवाई ही पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया,, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार,. , सहा. पोलीस अधीक्षक महक स्वामी, यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप पाटील, रामचंद्र जाधव, विशाल पैठणकर, किशोर आघाडे, सविता वरपे, श्रध्दा शेळके यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!