गावठी कट्ट्यातुन सुटलेल्या गोळीने चिमुकल्याचा जीव घेतला…अखेर गंगापूरच्या चिमुकल्या आर्यनची आठ्ठेचाळीस तासांची झुंज संपली..गावठी कट्टा देणारा स्थानिक?

गावठी कट्ट्यातुन सुटलेल्या गोळीने चिमुकल्याचा जीव घेतला.
अखेर गंगापूरच्या चिमुकल्या आर्यनची आठ्ठेचाळीस तासांची झुंज अखेर संपली.. घाटीत आईने टाहो फोडल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले.
गावठी कट्टा देणारा स्थानिक?


गंगापूर (प्रतिनिधी) अखेर गंगापूरच्या चिमुकल्या आर्यनची आठ्ठेचाळीस तासांची झुंज संपली घाटीत आईने टाहो फोडल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले
शहरातील अहिल्यादेवी नगर येथे शुक्रवारी सायंकाळी घरात झालेल्या गोळीबारातील जखमी चिमुकल्याचा छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी २७ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान अडीच वर्षाच्या आर्यन राहुल राठोडचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी बाप राहुल राठोड याच्या गुन्ह्यात वाढ करण्यात आली असून चिमुकल्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील अहिल्यादेवीनगर येथे नवनाथ अंबादास भराड यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर बीड येथील दाम्पत्य राहुल कल्याण राठोड (२९) पत्नी संगीता व अडीच वर्षांच्या मुलासह भाडेकरू म्हणून राहत होते. राहुल हा शहरातील कर्ज
वितरण करणाऱ्या एका बँकेत वसुलीचे काम करतो. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या घरात झालेल्या गोळीबारात मुलगा आर्यन राठोड गंभीर जखमी झाला होता.या घटनेत आर्यनच्या डोक्याच्या मधोमध गोळी लागली होती, त्यामुळे खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अत्यवस्थेत त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
शुक्रवारी रात्री त्याच्यावर एक छोटासी शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर घाटीतील अतिदक्षता विभागात आर्यनची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र त्याची आठ्ठेचाळीस तासांची झुंज शेवटी अपयशी ठरली व चिमुकल्या आर्यने रविवारी सकाळी अकराच्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला.

आईचा आक्रोश मन हेलावणारा

गोळीबार प्रकरणाला कारणीभूत असलेला आर्यनचा बाप राहुल पोलीस कोठडीत असल्याने आर्यनजवळ आई व इतर कुटुंबीय होते. दरम्यान रविवारी सकाळी आर्यनच्या मृत्यूची बातमी डॉक्टरांनी देतात आर्यनच्या आई संगीता राठोड यांनी घाटी रुग्णालयात टाहो फोडला. यावेळी नातेवाईकांसह उपस्थितांचे डोळे पानावले होते, आई संगीता यांचा आक्रोश मन हेलावणारा होता.

बापावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

मुलाच्काया मृत्यूला कारणीभूत असलेला बाप राहुल कल्याण राठोड याला पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेऊन त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. त्याला शनिवारी सायंकाळी न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने राहुल राठोड यास एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान जखमी आर्यनचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मुलाच्या मृत्यूला कारणीभूत धरुन पोलिसांनी कलमामध्ये वाढ करत आरोपी राहुल कल्याण राठोड याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सपोनी भागवत नागरगोजे यांनी दिली असुन राहुल याला कट्टा देणारा स्थानिक असल्याची माहिती समोर येत आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक आवटी हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!