२३ वे तीर्थंकर पार्श्वनाथ पहाड मंदिर देखावा तयार करून निर्वाण कल्याणक महोत्सव साजरा. दुर्लभ सागर महाराज व संधान सागर महाराज यांचा सानिध्यात कीर्ती स्तंभाचे अनावरण…

२३ वे तीर्थंकर पार्श्वनाथ पहाड मंदिर देखावा तयार करून निर्वाण कल्याणक महोत्सव साजरा. दुर्लभ सागर महाराज व संधान सागर महाराज यांचा सानिध्यात कीर्ती स्तंभाचे अनावरण


छञपती संभाजीनगर (प्रतिनिधी). श्री पार्श्वनाथ ब्रह्मचार्य जैन गुरुकुल वेरूळ मध्ये आचार्य विद्यासागर महाराज यांचे परम प्रभावक परम शिष्य १०८ दुर्लभ सागर महाराज व संधान सागर महाराज यांचा मंगलमय चातुर्मास सुरू आहे आज जैन धर्माचे २३ वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांचा मोक्ष कल्याणक दिवस महाराजांच्या सानिध्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित विविध कार्यक्रमात सम्मेद शिखरजी येथे असणाऱ्या भगवान पार्श्वनाथ मंदिराचा भव्य पहाड मंदिर देखावा तयार करून २३ किलोचा लाडू बनवुन निर्वाण कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पहाड मंदिर चा भव्य देखावा तयार करण्यासाठी मुंबई येथील श्रावक श्रेष्ठी भरत जैन, दिव्या जैन, पारस जैन, प्रशांत जैन यांचे पहाड मंदिर देखावा तयार करण्यासाठी योगदान लाभले. यावेळी निर्वाण लाडू सजावट स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते यात रश्मी जैन यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. दुपारी पहाड मंदिर पायथ्याशी तयार करण्यात आलेल्या कीर्ती स्तंभाचे अनावरण नांदेड येथील विद्यादेवी विजय कासलीवाल यांच्या हस्ते करण्यात आले.पहाड मंदिर स्थित भगवान पार्श्वनाथ मंदिरात अभिषेक पूजन व निर्वाण लाडू चढवण्याचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

यावेळी पार्श्वनाथ भगवंताच्या अभिषेक पूजन व निर्वाण लाडू चढविण्याचा बोल्या संपन्न झाल्या. दिनेश गंगवाल, ङाॅ तुषार राखी कोमल लोहाडे पवन जयकुमार पाटणी नाशिक,वर्धमान पांडे,प्रशांत जैन मुंबई, विजय कासलीवाल नांदेड सुजित गोधा नांदेड, सुमेर काला,अभिजित काला,सविता प्रवीण गोसावी यांना अभिषेक पूजन व निर्वाण लाडू चढविण्याचा मान प्राप्त झाला. यावेळी महाप्रसादाचे आयोजन संभाजीनगर येथील शांतिदेवी देवेंद्रकुमार सोनी यांच्या तर्फे करण्यात आले.प पू १०८ दुर्लभ सागर व संधान सागर महाराज यांच्या मांगलिक प्रवचनाने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष दिनेश गंगवाल, महामंत्री प्रेमचंद पाटणी, गौतम भाऊ ठोळे, निर्मल ठोले, सुमित ठोले ,नवीन पाटणी, महेंद्र जैन, अभिजित काला, मदनलाल पांडे,रवि इंगलवार वर्धमान पांडे व चातुर्मास कमिटीने परिश्रम घेतले अशी माहिती राजकुमार पाड़े अतूल बांदे सुहास मिश्रीकोटकर पीयूष कासलीवाल नरेंद्र अजमेरा यानी दिली
कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर, हतनूर, लासूर, कन्नड, चापानेर आदी ठिकाणाहून भाविकांनी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!