गंगापूर – रत्नापूर विधानसभा मतदार संघात विकासाची गंगा प्रवाहित करू – महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे * गंगापूर तालुका सर्वाधिक मताधिक्याने सरस राहील * पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा निर्धार गंगापूर – रत्नपूर विधानसभा मतदार संघात प्रचाराचा वेग वाढला


गंगापूर (प्रतिनिधी)- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विकास पुरुष आहे. कल्याणकारी योजना तळागळा पर्यंत पोहचल्याने आपला देश जागतिक पातळीवर पाचव्या क्रमांकावर आला आहे. शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे तत्व स्वीकारून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यासह गंगापूर – रत्नापूर विधानसभा मतदार संघात विकासाची गंगा प्रवाहित केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी केले. ते गंगापूर तालुक्यामध्ये दि. ३० एप्रिल रोजी शिल्लेगांव , जामगाव, शेंदुरवादा, वाळुज,व रात्री ९ वाजता गंगापूर येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते.

यावेळी आमदार प्रशांत बंब, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कैलास पाटील,जिल्हा सचिव प्रदीप पाटील, राजेंद्र राठोड भाजपाचे तालुकाप्रमुख रवी चव्हाण, सभापती भाऊसाहेब पदार, शहराध्यक्ष मारुती खैरे, रामेश्वर मुंदडा, सचीव प्रशांत मुळे, गोपाल वर्मा, कृष्णकांत व्यवाहारे, अतुल रासकर दिपक साळवे, सुर्यकांत थोरात, भाजपा युवा मोर्चाचे अमोल जाधव, सुमीत मुंदडा,मार्केट कमिटीच्या सुनील पाखरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप निरफळ, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीपसिंग राजपुत, शहराध्यक्ष लक्ष्मणसिंग राजपूत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अंकुश काळवने, अल्पसंख्यांक सेलचे अब्दुल सत्तार, बाळासाहेब चव्हाण, अरुण रोडगे, शिवसेनेचे अनुसूचित जाती उप तालुकाप्रमुख संदीप पाटील आढाव, सरपंच गणेश तूपशेंद्रे, राष्ट्रवादीचे कृष्णा बोबडे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सविताताई शहाणे, भाजपाचे शहर प्रमुख अनिल बहिरट, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख करुणाताई पोळ, हरिभक्त पारायण कडूबा महाराज, जालिंदर पाटील, शिवसंग्रामचे जिल्हाप्रमुख किशोर चव्हाण, महिंद्र गंडे, भाजपाचे बाबुराव शिंदे, आपेगावचे अशोक जाधव, योगेश केरे, हभप गवंदे महाराज आदींची प्रमुख उपस्थिती होती.
नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. काँग्रेस ने ५० – ६० वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते प्रधानमंत्री मोदी यांनी करुन दाखवले. भारताला आता जगात मान आहे. एक – एक मतदान महत्वाचे आहे. सर्वांनी जागृत राहून काम करावं.आमदार प्रशु बंब यांच्यावर स्तुती सुमने उधळली. गोदावरीत लोकं स्नान करतात. गोदावरीच तुम्ही घरी आणली, असे वक्तव्य त्यांनी आमदार बंब यांच्याबद्दल केले. पुढे बोलताना महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे म्हणाले, की या खात्याला नावारूपाला आणण्याचे काम मी केले. विहिरीसाठी जीएसडीए प्रमाणपत्र, लोकसंख्येची अट, अंतराच्या प्रमाणपत्राची अट काढून टाकली. ३ लाखात विहीर होत नाही त्यासाठी ४ लाखाची तरतुद केली. आचार संहिता लवकर लागली नाहीतर ५० हजार अजुन वाढवणार होतो. फळबागेचे अंतराची अट काढली. २० बाय २० च्या अंतरावर आंबा लावायची अट होती. त्याशिवाय एमबी होत नव्हती. ही अट काढून घेतली. तालुक्यात ४ हजार गोठे, पाच हजार विहिरी झाल्या. पांदण रस्ते १ लाख रुपये १ किमिला होते. आता त्यासाठी १ किमिसाठी २४ लाख केले. अकुशलला ९ लाख आले. ९ लाखाचे अकुशल ३ लाखावर आले. शेतीला पक्का रस्ता तयार होईल. शेतीचा विकास रस्त्यावर अवलंबून आहे. शेततळे आणि पंनी मनरेगात आणली. मोहगनी आणली. केळी आणली. घरोघर या खात्याचा फायदा झाला. १८०० कोटी खर्च पूर्वी होता आता ६ हजार कोटी रुपये खर्च आहे. यामुळे जिल्ह्याचा आणखीन विकास करण्यासाठी येत्या १३ तारखेला धनुष्य बाणाचे बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी
राकॉ चे जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील म्हणाले, की संदीपान भूमरे यांना विकासासाठी निवडून द्यायचे आहे. शिवसेनेचे आसाराम चव्हाण म्हणाले, की ही निवडणूक देशाची आहे. आपसातील मतभेत विसरून कामाला लागावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात आपल्या देशाची प्रगती झाली आहे. तशीच प्रगती आपल्याला आपल्या जिल्ह्याची करायची आहे. महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे यांना मत म्हणजे मोदींना मत. येत्या १३ तारखेला धनुष्य बाणाचे बटन दाबण्याचे आवाहन केले.
रोहयो मंत्री म्हणून त्यानी रोहयोच्या माध्यमातून राज्यभरात चांगले कामं केली. काही विहीर, पांदन रस्ते यातील जाचक अटी हटविले. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील चव्हाण म्हणाले, की ही निवडणुक विकासाची आणि विचाराची आहे. संदीपान भूमरे यांच्या दूरदृष्टीतून जिल्हाभरात चांगली कामं झाली आहे. या परिसरात १००- १५० गाई गोठे, रस्ते, पेव्हर ब्लॉक मिळवून दिले. मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे म्हणून महायुतीचे उमेदवार श्री भुमरे यांना निवडून द्यायचे आहे.

महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे विकासाची दृष्टी असलेला नेता, त्यांना विजयी करा – आमदार बंब
– आमचा देश शेतीप्रधान आहे. शेतीसाठी पाणी आणि विज लागते. आमच्या आरोग्याची काळजी सरकार का घेत नाही, हे प्रश्न पडले पाहिजे. सरकारने वॉटर ग्रीडच्या माध्यमातून बांधावर पाणी पोहचवले. रोहयो मंत्री संदीपान भूमरे यांनी रोजगार हमी योजना नावा रूपाला आणली आहे. १२ जनावरांची अट काढली. पिकांच्या अंतराची अट काढली. कांदा चाळ संदर्भात अट काढली. पेव्हर ब्लॉक्स, गाव अंतर्गत रस्ते रोहयोच्या माध्यमातून केले. त्यामुळे विकासावर मत द्यायचे आहे. धनुष्य बाण मनातून जाऊ शकत नाही. भारत देशाचा विचार केल्याशिवाय इतर देशांना निर्णय घेता येत नाही. लखमापूर ते सुलतानाबाद पाणीपुरवठा होईल. पाणंद रस्ते २४ लाख रुपये किमी आहे. शेत रस्ते पहिले झाले पाहिजेत. चांगल्या स्वभावाचे आणि समाजहिताचे काम करण्याची त्यांना उमेद आहे. लोकशाहीचा उत्सव आहे. प्रचंड लीड मतदार संघातून द्यायची आहे. यासाठी कंबर कसून कामाला लागावे.
– ———————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!