अवैध मुरूम दगड उत्खनन व वाहतूक प्रकरणी दहेगाव बंगला येथील कुलटेक कंपनीला तहसील प्रशासनाने ठोकला 35 लक्ष 11 हजार दोनशे रुपयांचा दंड

अवैध मुरूम दगड उत्खनन व वाहतूक प्रकरणी दहेगाव बंगला येथील कुलटेक कंपनीला तहसील प्रशासनाने ठोकला 35 लक्ष 11 हजार दोनशे रुपयांचा दंड
गंगापुर (प्रतिनिधी ) तालुक्यातील दहेगाव येथील कुलटेक अप्लायंसेस प्रा.लि.या कंपनीने बांधकामासाठी तहसील प्रशासनाचा उत्खनन व वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना न घेता अवैधरित्या मुरूम दगड उत्खनन व वाहतूक केल्या प्रकरणी दोषी धरून गंगापूर चे तहसीलदार सतीश सोनी यांनी कंपनी प्रशासनाला 35 लक्ष 11 हजार रुपये दंड ठोकवला आहे. दंड न भरल्यास सदर कंपनी च्या सातबारा उताऱ्यावर महसूली बोजा टाकण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सदर कंपनीच्या अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणी श्री स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष वाल्मीक शिरसाठ यांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने तहसील प्रशासनाने स्थळ पंचनामा व सर्व कागदपत्रे साक्षीपुरावे याची तपासणी करून सुनावणी घेत हा आदेश पारित केला आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, दहेगाव येथील गट नं. 229 मध्ये कुलटेक अप्लायंसेस प्रायवेट लिमीटेड कंपनीचे बांधकाम चालू आहे या बांधकामासाठी कंपनीने महसूल प्रशासनाचा कोणताही रीतसर परवाना न घेता परस्पर जुजबी स्वरूपात रॉयल्टी भरून प्रत्यक्षात जास्तीचा मुरूम दगड वापरण्यात आल्याची तक्रार वाल्मीक शिरसाठ यांनी 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रशासनाकडे केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार गंगापूर यांनी दहेगाव येथील मंडळ अधिकारी,तलाठी यांच्या पथकामार्फत कामाची प्रत्यक्ष पाहणी व पंचनामा करण्याच्या आदेश दिले होते. तलाठी सजा दहेगाव यांच्या पंचनाम्यानुसार सदरील बांधकामात एकूण 700 ब्रास मुरुमाची भरती, दगडाचे बेसमेंट बांधकामासाठी 271 ब्रास दगड, तसेच सोलींग अंदाजे, 26 ब्रास असा गौणखनिज वापर केल्याचे दिसून आले आहे. कंपनीच्या बांधकामासाठी एकत्रीत 997 ब्रास मुरुम दगडांचा वापर केल्याचे अहवालात नमूद केले आहे तसेच अहवालासोबत जोडलेल्या ग्रास चलना प्रमाणे कंपनीच्या बांधकामासाठी वापरलेले 997 ब्रास मधून 175 ब्रास मुरुम दगड वजा जाता 822 ब्रास मुरुम दगडाचा अतीरिक्त वापर केल्याचे दिसून आल्याने तसेच सदरील अतीरिक्त गौणखनिजाचे अवैधरित्या वापर केल्याचे निष्पन्न झाल्याने सदरील मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन व वाहतुक केल्याचे अहवालानुसार आढळून आल्याने तहसीलदारांनी सदर कंपनीला 17 ऑक्टोबर 2022 रोजी बाजारमूल्याच्या पाच पट मुरुम दगडाचे बाजारमूल्य 1200 रु प्रतिब्रास प्रमाणे 882 ब्रास मुरुमाचे मुल्य 1058400 इतके आहे त्याच्या पाच पट रक्कम 5292000/- रुपये ( अक्षरी – बावन्न लक्ष ब्यान्नव हजार रुपये मात्र) दंड व 882 ब्रास मुरुमाचे रॉयल्टी रक्कम प्रति ब्रास 600 प्रमाणे 529200/- (अक्षरी पाच लक्ष एकोनतीस हजार दोनशे रुपये अशी एकूण 5821200 अक्षरी अठ्ठावन लक्ष एकवीस हजार दोनशे रुपये दंड भरणे बाबत नोटीस बजावली. त्यानंतर दोन्ही पक्षांची तहसीलदार श्री सतीश स्वामी यांच्या समक्ष सुनावणी होऊन कुलटेक अप्लायन्स प्रा लि या कंपनीच्या खुलाशात दाखवल्यापेक्षा देखील अधिकचे गौण खनिज वापरल्याचे निष्पण्ण झाल्यामुळे संबंधितावर
महसूल अधिनियम 1966 च्या चे कलम 48 (7) (गौण खनिज काढणे व हलविणे बाबत) या नियमान्वये 532 ब्रास मुरमाचे 1200 रुपये बाजार भावाप्रमाणे 638400 /- अक्षरी लक्ष अडतीस हजार चारशे, त्याच्या पाचपट दंड रुपये 3192000 एकतीस लक्ष ब्यानव हजार व स्वामित्व धन मूल्य 600 प्रमाणे 532 ब्रासचे 319200/- अक्षरी तीन लक्ष एकोणावीस हजार दोनशे असा एकूण 3511200 पसतीस लक्ष अकरा हजार दोनशे रुपये दंड ठोठावला असून आदेश मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत ग्रास प्रणालीवर दंड भरून पावतीची प्रत कार्यालयास जमा करावी दंड न भरल्यास
दंडाचे रक्कम संबंधित मालमत्तेवर जमीन महसूल म्हणून बोजा चढवण्यात यावा असा आदेश पारित केला आहे. तहसील प्रशासनाच्या या आदेशामुळे तालुक्यात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहे.

*तहसील प्रशासनाची कारवाई दिशाभूल करणारी*
कुलटेक अप्लायन्स अवैध उत्खनन प्रकरणी तहसील प्रशासनाच्या पथकाने केलेल्या प्राथमिक चौकशी व पंचनामा यानुसार सदर कंपनीने तहसील प्रशासनाकडून नियमानुसार घ्यावा लागणारा गौण खनिज उत्खनन व वाहतूक परवाना घेतलेला नाही खुलासा सादर करताना देण्यात आलेल्या पावत्या ह्या निराधार असून नियमाप्रमाणे सदर कंपनीला 58 लक्ष रुपये दंड होणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाने संबंधित कंपनीला पाठीशी घालत केवळ 35 लाख रुपये दंड केला आहे यामुळे शासनाचे जवळपास 23 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे म्हणून तहसीलदारांच्या या निर्णयाविरोधात नियमानुसार अपील दाखल करणार आहे.
-वाल्मिक शिरसाठ
अध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!