गंगापूर (प्रतिनिधी) बरखास्त झालेल्या लासुर स्टेशन बाजार समितीचा पदभार स्वीकारताच आ. प्रशांत बंब व आ. रमेश बोरनारे यांच्या समर्थकांनी फटाके फोडून साजरा केला जल्लोष
गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधकांनी घेतलेला होता मात्र त्या बरखास्तीच्या निर्णयाला पणन, वफ मंत्री नाअब्दुल सत्तार यांनी जिल्हा उपनिबंधकाच्या त्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे त्यामुळे लासुर स्टेशन बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा आमदार प्रशांत बंब व आमदार प्राध्यापक रमेश बोलणारे यांचे संचालक मंडळ कार्यरत होऊन लगेच आ. प्रशांत बंब यांचे समर्थक शेषराव नाना जाधव यांनी तालुका निबंधक किरण आहेर यांच्याकडून सभापतीपदाचा तर अनिल चव्हाण यांनी उपसभापतीपदाचा कार्यभार पुन्हा एकदा हाती घेतला आहे यावेळी संतोष जाधव , अनिल चव्हाण व सर्व संचालक मंडळ उपस्थिती होते.