सराफा दुकानदारांनी चो-या पासुन संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजनांचा वापर करावा- पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले

सराफा दुकानदारांनी चो-यापासुन संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजनांचा वापर करावा *पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले*

गंगापूर (प्रतिनिधी)
गंगापूर पोलीस ठाणे येथे सराफ दुकानदार यांची सुरक्षितता बैठक बोलवण्यात आली होती यावेळी दुकानात वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी योग्य सुरक्षितता बाळगण्यासाठी पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी मार्गदर्शन केले .
ज्वेलरी दुकानात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दुकाना मध्ये चांगल्या दर्जाचे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवावे, शक्य झाल्यास ब्लू टूथ कॅमेरे बसविण्यात यावे तसेच ते नेहमी चालु स्थितीत ठेवावे व त्याचा बॅकअप डाटा
सेव होतो किंवा नाही याची खात्री करावी. तसेच सी.सी.टी.व्ही.चे डी.व्ही. आर. हे दर्शनी भागात उघड्यावर न ठेवता बंदिस्त लॉकअप मध्ये ठेवावे. त्याचप्रमाणे दुकानामध्ये अलार्म सिस्टीम बसवून घ्यावे. सराफा मार्केट मध्ये किंवा दुकानाचे बाहेर रात्रीच्या वेळी फिरता गार्डची कायमस्वरूपी व्यवस्था करावी. सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना अत्यावश्यक आहे त्या-त्या उपाययोजना करण्यात याव्या. जेणे करून दुकानातील मौल्यवान दाग-दागिने चोरीस जाणार नाही याची काळजी घ्यावी असे अवाहन पोलीस निरिक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी केले.
यावेळी गुप्तवार्ता विभागाचे मनोज नवले सराफ असोसिएशनचे अध्यक्ष आशिष शहाणे, गौरव कुलथे,सुनील अंबिलवादे, योगेंद्र वर्मा वीरेंद्र दहिवाळकर देवेंद्र सुवर्णकार,अनिल चिंतामणी, जीवन मुंडलिक, महेश उदावंत,दत्ता कुलथे, गौरव कपीले , संतोष वर्मा, आनंद पाटील, अविनाश जाधव, अनिल वर्मा, गिरीश गंगापूरकर, कृष्णा सुवर्णकार , बाळासाहेब पाटील , अनिल शेलार भास्कर पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!