सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या गंगापूर तालुका बंद ठेवून निषेध करणार.मराठा समाजावर अमानुष लाठीचार्ज करणा-या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी त्वरीत राजीनामे देऊन दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात यावी.

सकल मराठा समाज गंगापूरच्या वतीने उद्या गंगापूर तालुका बंद ठेवून निषेध करणार*
मराठा समाजावर अमानुष लाठीचार्ज करणा-या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी त्वरीत राजीनामे देऊन दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात यावी

गंगापूर (प्रतिनिधी)मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलक व महीला भगीनीवर लाठीचार्ज करणा-या पोलिस अधिकारी यांच्या कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे


गंगापूर तहसील कार्यालयात २ सप्टेंबर रोजी सकाळी बारा वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना उपविभागीय अधिकारी डॉ अरुण ज-हाड व तहसीलदार सतीश सोनी यांच्या मार्फत निवेदन देऊन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली
२९ ऑगस्ट २०२३ गेल्या पाच ते सहा दिवसापासुन जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी गावामध्ये मराठा समाजाच्या वतीने मराठा सेवक मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षण व इतर मागण्यासाठी आंदोलन सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने मराठा आरक्षण या विषयावर चर्चा करून मार्ग काढण्याऐवजी अचानक १ सप्टेंबर २०२३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी खाजगी गुंड व पोलीस प्रशासनाचा मोठा फौजफाटा यांना आदेशीत करून शांततेत सुरू असणाऱ्या आंदोलन स्थळावर कट रचुन सुड बुद्धीने महिला, मुलं, नागरीक यांच्यावर विनाकारण अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडुन तसेच सशस्त्र गोळीबार, लाठीचार्ज करून अनेक महिला, मुले व नागरीक यांना जखमी व रक्तबंबाळ केले.ऐन रक्षाबंधनाच्या सणावर महिलांची व राज्यातील नागरीकांची रक्षा करण्याऐवजी त्यानांच रक्तबंबाळ करणारे
देशातील हे पहिलेच राज्य असेल म्हणुन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व
संबंधीत पोलीस प्रशासन यांना जवाबदार धरून यांच्या पदाचा राजीनामा घेऊन त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी व दोषी अधिकारी, प्रशासनावर गुन्हा दाखल करून कडक कार्यवाही करावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी विनोद काळे, लक्ष्मण सांगळे, माजी नगरसेवक अविनाश पाटील,डॉ उध्दव काळे, भाऊसाहेब शेळके, देवीदास पाठे.बाबासाहेब चव्हान,आदींसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!