श्री मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर येथे राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी 

*श्री मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर येथे राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी*

गंगापूर (प्रतिनिधी) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, श्री मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर येथे सोमवार, दि.26.06.2023 रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रभारी प्राचार्य डॉ.बी.टी.पवार यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी इतिहास विभागातील प्रा.डॉ.विष्णू वहाटुळे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.वैशाली बागुल, उपप्राचार्य प्रा.विशाल साबणे, पर्यवेक्षक डॉ.हरीभाऊ सातपुते, प्रबंधक .भास्कर सुरवसे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!