शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीच्या मागे न लागता सेंद्रिय शेतीवर भर द्यावा -मनीषा व्यवाहारे


गंगापूर (प्रतिनिधी)शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीच्या मागे न लागता सेंद्रिय शेतीवर भर द्यावा व रासायनिक औषधांच्या पाकीट व डब्यांची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावुन पिपिई किट घालून फवारणी करावी- मनीषा कृष्णकांत व्यवाहारे

तालुक्यातील काटेपिंपळगांव येथे
सेवा संस्था पि एस सी पि प्रोग्राम तर्फे मुलांची व शेतकऱ्यांची रॅली काढण्यात आली या रॅलीत मुलांच्या हातात असलेल्या फलकावर माहिती होती आपली शेती शास्वत शेती शास्वत पद्धतीने करू, जैविक कीटकनाशकाचा वापर करू संगोपन मित्र कीटकाचे करू, जैविक चा वापर उत्पादनाला पडेल भर, करू सापळ्याचा उपयोग अनु बोंड आळी वर नियंत्रण, कंपोस्टिंग खताचा वापर करू जमीन सुपीक करू, सुरक्षा साधनाचा वापर करू मानवी आरोग्य सांभाळून, बालमजुरी टाळा समृद्ध पिढीत घडवा, झाडे लावा झाडे जगवा, मोनोचा वापर टाळू किटकाचा आळा घालू अशा घोषणा देण्यात आल्या रासायनिक औषधीच्या बॉटल जमा करण्यात आल्या व त्याची विल्हेवाट कशी लावावी याची माहिती देण्यात आली यावेळी पी पी किट घालून औषध फवारणी करताना शरीराचे संरक्षण होणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या या किटमध्ये डोळ्यांसाठी चष्मा, मास्क, हातमोजे आणि अॅप्रनचा समावेश आहे. किट घालून शेतकऱ्यांनी पिकांवर औषध फवारणी करणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे फवारणी केली पाहिजे मार्गदर्शन केले यावेळी सेवा संस्था आगेवानच्या मनीषा कृष्णकांत व्यवहारे व भाग्यश्री शिवाजी धोत्रे यांनी मार्गदर्शन केले या रॅलीत शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते यावेळी सुभाष धोत्रे, अनिल धोत्रे, गणेश चव्हाण, नानासाहेब धोत्रे, महापौर शिवाजी धोत्रे, देविदास आण्णा धोत्रे, कारभारी बारसे, संजय शेळके, बाळू शेळके, अण्णा सोनवणे, व्यंकट धोत्रे, मनोज पिंपळे, विश्वनाथ घाडगे, मीरा बाबासाहेब जगताप आदी शेतकरी महिलांसह शिक्षक वृंद उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!