विठाई हाॅस्पिटल मध्ये कर्करोग तपासणी व मार्गदर्शन शिबीर
गंगापूर (प्रतिनिधी) कृपामयी हॉस्पिटल्स छत्रपती संभाजीनगर व विठाई हाॅस्पिटल गंगापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे
गंगापूर येथे कृपामयी हॉस्पिटल्स छत्रपती संभाजीनगर व विठाई हाॅस्पिटल यांच्या तर्फे शनिवारी १७ जुन रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत विठाई हॉस्पिटल गंगापूर येथे कर्करोग तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात तज्ञ कॅन्सर सर्जन डॉ. विराज बोरगावकर, कॅन्सर केमोथेरपी तज्ञ डॉ. केतन शिरसाठ, कॅन्सर रेडिएशन तज्ञ डॉ. स्नेहा मुंढे, स्त्रीरोग वि कॅन्सर विशेषज्ञ डॉ. साक्षी झवर , कॅन्सर रेडिएशन तज्ञ डॉ. उत्पल गायकवाड हे मार्गदर्शन करणार असुन तपासणी करणार आहे या शिबिरातील रुग्णांना छत्रपती संभाजीनगर येथील कृपामयी हाॅस्पिटल मध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सर सर्जरी,रेडिएशन विभाग व किमोथेरपी विभाग अद्ययावत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स,डे केयर किमोथेरपी वॉर्ड
लेसर कर्करोग उपचार पद्धती माफक दरात करतात महात्मा ज्योतिबा फुले (MJPJAY) जीवनदायी योजने अंतर्गत कर्करोग (कॅन्सर) रुग्णांसाठी
मोफत आरोग्य सेवा दिली जाते