रागाच्या भरात निघून गेलेल्या पुरी येथील युवकाचा मृतदेह गोदावरी नदीच्या पात्रात आढळला.


गंगापूर (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील
नेवासा तालुक्याच्या हद्दीतील गोदावरी नदीच्या पाण्यात मंगळवारी ११ जुनला आढळूनआलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून मृत व्यक्ती गंगापूर तालुक्यातील पुरी येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, मंगळवारी ११ जुन रोजी सकाळी साडे आकराच्या सुमारास गोदावरी नदीच्या पाण्यात एक अनोळखी बेवारस मृतदेह तरंगतांना आढळून आल्याची माहिती नेवासा पोलिसांना मिळाली.त्यांनी लगेच घटनास्थळी जाऊन मृताची ओळख पटविण्यासाठी सर्वत्र माहितीचे वर्णन सोशीलमीडियावर टाकले.पण ओळख पटली नाही म्हणून त्यांनी प्रवरासंगम शिवारात मृतदेहाचा दफनविधी केला.
गंगापूर तालुक्यातील पुरी येथील प्रभाकर कचरू राऊत वय (३२)हा अविवाहित युवक रागाच्या भरात रविवारी ९ जुन रोजी सायंकाळी पाच पासून घरातुन बेपत्ता झाला होता. कुटुंब नातेवाईकांनी त्याची सर्वत्र शोधाशोध केली पण तो आढळून आला नाही .
गुरुवारी १३ जुन रोजी मृताचे वर्णन आणि अंगातील कपड्या वरून शोध लागला.नातेवाईकानी नेवासा पोलीस स्टेशन गाठून माहिती देऊन ओळख पटविली.पोलिसांनी पुरलेलं मृतदेह पुन्हा उकरून काढून मृताच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले.
गुरुवारी रात्री साडे सात वाजता पुरी येथे राऊत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राऊत यांच्या पश्चात आई वडील ,एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.
या प्रकरणी नेवासा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक ए. एच.लिपणे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!