भेंडाळा शिवारातील गॅस रिफिलींगचा अड्डा पोलीसांच्या पिंक पथकाने उध्वस्त केला एक कोटी ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.बातमीचा दनका


गंगापूर (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील भेंडाळा शिवारातील एका बंद हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध एलपीजी गॅस अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत चार टॅंकर ७५ गॅस टाक्यासह गॅस रिफिलींगच्या साहीत्यासह १ कोटी ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वैजापूर उपविभागीय पोलिस अधिकारी महक स्वामी यांच्या पिंक पथकाने ४ जुन रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर जाणारे रोडवरील गंगापूर तालुक्यातील भेंडाळा कॅफे या हॉटेलमध्ये अवैध एलपीजी गॅस रिफिलींगच्या अड्ड्यावर धाड टाकली असता
आरोपी अक्षय शिवाजी जाधव ३६ वर्ष रा. रतडगाव ता. जि. अहमदनगर, अमरसिंग लालासिंह २२ वर्ष रा. सांतलपुर ता. लालगंज जि. रायबरेली , मिथलेशसिंह रनविजयसिंह २६ वर्ष रा. सातनपुर ता. लालगंज जि. रायबरेली , रखमाजी वैजीनाथ सानप ३० वर्ष रा. दैठनाघाट ता. परळी जि. बीड , चांगदेव सोपान जाधव २४ वर्ष रा. रतडगाव ता. जि. अहमदनगर , विजय रावसाहेब कराळे रा. कापुरवाडी ता.जि.अहमदनगर, सद्दाम मुजीब अन्सारी २९ वर्ष रा. चैनपुर राज्य बिहार , नरेंद्रसाधु यादव २८ वर्ष रा. मसुरीयापुर ता.सबडी जि. आझमगड राज्य उत्तर प्रदेश व टैंकरक्र. एमएच ०९ इएम २९७८ चा फरार चालक हे अवैध एलपीजी गॅस रिफिलींग करत असतांनाच रंगेहाथ पकडले त्यांच्या ताब्यातुन प्रत्येकी ३० लाख रुपये किंमतीचे चार गॅस भरलेले अशोक लेलंड टँकर क्र. एमएच ०४ जेयु ८९९७ , टँकर क्र. एमएच ४० बीजी ६०९२ , टँकरक्र. एमएच ४० बीजी ५०९०,टँकरक्र. एमएच ०९ ईएम २९७८ या वाहणाचा चालक फरार झाला आहे १० लाख रुपये किंमतीचे एक टाटा ४०७ टेम्पो क्र एमएच ०४ ईवाय ६३४१ ही वाहने घटणास्थळावरुन ताब्यात घेण्यात आली तसेच १ लाख ९८ हजार रुपये किंमतीच्या एकुण ६० गॅसच्या टाक्या, खाली प्रतीगॅस टाकीची किंमत २ हजार रुपये असे एकुण १लाख २० हजार व ६० गॅसच्या टाक्या पुर्णगॅसने भरलेल्या असुनप्रती गॅसच्या टाकी मधील गॅसचीकिंमत १ हजार ३०० रु. दराप्रमाणे एकुण ७८ हजार रुपये किंमतीच्या गॅसटाक्या घटणास्थळी मिळुन आल्या. १५ रिकाम्या गॅसटाक्याज्याची किंमत दोन हजार रुपये ईतर १० हजार रुपयांचे प्लॅस्टीकचे पाईप नोजल व ईतर साहीत्य व रोख रक्कम १ लाख ६५ हजार २०० रुपये अक्षय शिवाजी जाधव याच्यां ताब्यातुन जप्त करण्यात आल्या असा एकूण १ कोटी ३४ लाख ३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील वरील आरोपी हे वरील वर्णनाचे व किंमतीचेसाहीत्य सह जिवीतास धोक्यात येणा-या गॅस या स्फोटक पदार्थाबाबत बेदकारपणे व हईगईपणाचे वर्तन करुन यातील टँकर वरील चालक व आरोपीतांनी त्यांचे मालकाने विश्वासाने सोपविलेल्या गॅसच्या टँकरमधीलगॅस स्वतःच्या फायदयासाठी अप्रामाणिकपणे चोरटी विक्री करताणा मिळुन आल्या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये उपविभाग वैजापुरच्या पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नितीन नलावडे यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपी विरोधात कलम ३८१,३७९,४०६,२८५,२८६,३४ भादंवि सहकलम ७,८,१० (अ) अत्यावश्यक वस्तु अधि. १९५५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले हे करत आहे ही कामगिरी पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी वैजापूर महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथक पोलिस उपनिरीक्षक नितीन नलवडे, पोलिस उपनिरीक्षक काळे , पोलिस कर्मचारी सरोदे, मोरे, जोनेवार यांनी केली असून ९ आरोपींना अटक करण्यात आली असून यातील एक आरोपी फरार झाला आहे त्याचा शोध गंगापूर पोलिस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!