पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई. गंगापूर शहरातील कत्तलखान्यातुन सात गोवंशाची सुटका


गंगापूर (प्रतिनिधी) पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने शहरातील कुरेशी गल्लीत पहाटे पाच वाजता कत्तलखान्यात धाड टाकून सात गोवंशाची सुटका करून एकाला ताब्यात घेऊन चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांचे विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गंगापूर शहरातील कुरेशी मोहल्ला येथे जनावरांची गोवंश जनावरांची कत्तल करत आहेत त्यावरून सदर ठिकाणी छापा मारला असता रफिक फत्तू कुरेशी राहणार कुरेशी मोहल्ला गंगापूर यास ताब्यात घेऊन कत्तलेसाठी आणलेले गोवंश जातीचे सात जनावरे मिळुन आल्याने सोबतच्या पंचासमक्ष विचारपुस करुन सदिस्तर पंचानामा करून जप्त केले व पोलीस स्टेशनला घेवुन आलो. ही कारवाई १४ जुन रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास कुरेशी मोहल्ला गंगापुर येथे रफिक फत्तु कुरेशी वय ३८ वर्ष, रा. कुरेशी मोहल्ला गंगापुर ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर हा अवैधरित्या गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करप्याराठी एक गो-हा कत्तल खान्यामध्ये घेवुन जात असताना कत्तल करण्यासाठी आणलेले हत्यार, चाकु, कु-हाड व एक लोखंडों टोचण याचेसह मिळुन आला, परंतु पोलीस अचानकपणे आल्याने त्याने गो-हा सोडुन दिला. तसेच बाजुलाच पाच गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्यासाठी ताब्यात बाळगुन त्याना चारा पाणी न देता जनावरांना क्रूरतेने दागणुक देवुन छळ करतांना एकूण सहा जनावरे अंदाजे किंमती ३४ हजार रुपयांची व कु-हाड, चाकु व टोच्या तिन्ही मिळून किंमत २५० रुपयाचे असा एकूण ३४ हजार २५० रुपयांचे ऐवजासंह मिळुन आल्याने शिरसाट यांच्या फिर्यादीवरून रफिक फत्तु कुरेशी यांचेविरुध्द महारष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५,५ (ब) सह प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करणे बाबत अधिनियम १९६० चे कलम ११(१) (क), ११(१) (थ), ११ (१)अज), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाट , पोलिस हवालदार नवनाथ कोल्हे, रामेश्वर धापसे, सोनवणे , गायकवाड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पोलिस उपनिरीक्षक दुलत, शिरसाट, नागझरे, घुगे, वाघ,तांदळे गंगापूर पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक अश्विनी कुंभारे, पोलिस अभिजित डहाळे, अमोल कांबळे आदींनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!