निंदनीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार गंगापुर येथील घटना

*निंदनीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार गंगापूर शिवारातील घटना*
गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर शिवारातील एका शेतातील झोपडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यांला गंगापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार १७ जुन रोजी बारा वाजेच्या सुमारास विक्रम साहेबराव जाधव यांच्या शेतात काम करणाऱ्या व तिथेच बांधलेल्या शेतातील झोपडीत व २० जुन रोजी रात्री एक ते दोन वाजेच्या दरम्यान विक्रम जाधव यांच्या शेतातील झोपडीत आरोपीने फिर्यादीला झोपेतून उठून फिर्यादीच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादीचे इच्छेविरुद्ध विक्रम साहेबराव जाधव (२८) राहणार जयभवानी नगर याने बळजबरी करून दोन वेळा बलात्कार केल्या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्यादीच्या तक्रारीवरुन कलम ३७६(२) (एन), ५०६, भादवि सह पोक्सो कलम क ४,८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास प्रभारी सपोनी शाईनाथ गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक डी एस साखळे हे करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!