तेलंगणा राज्यात शेतकरी समृद्ध झाल्याने एकही आत्महत्या नाही

महाराष्ट्र राज्य तर नैसर्गीकरीत्या  समृद्ध आहे. सर्व गोष्टी महाराष्ट्रात करणे सहज शक्य असुन देखील राज्यकर्त्यांची मानसिकता नसल्याने शेतकर्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही यासाठी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला महाराष्ट्रात बळकट करण्यासाठी संभाजी नगर येथे आयोजित सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खासदार बी. बी पाटील यांनी केले

 संभाजीनगर शहरात होत असलेल्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांच्या सभेला गंगापूर तालुक्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आव्हान भारत राष्ट्र समितीचे जहिराबादचे खासदार बी बी पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले
संभाजीनगर येथील बीड बायपास जवळील  जाबिंदा मैदानावर होत असलेल्या सभेची माहिती देण्यासंदर्भात पाटील यांनी गंगापूर मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी  भारत राष्ट्र किसान समितीचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम, बी आर एस चे संतोष माने, संपत रोडगे,आप्पासाहेब माने यांची प्रमुख उपस्थित होती पाटील यांनी तेलंगाना राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवत असलेल्या योजनाची सविस्तर माहिती पत्रकारांना दिली तेलंगाना राज्य शेतकऱ्यांना मोफत वीज, पाणी बरोबरच सर्वच घटकांचा बारकाईने विचार करून नियोजनबद्ध राज्य विकसित केले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात देखील आपल्याला तेलंगणाच्या धर्तीवर विकास साधण्यासाठी भारत राष्ट्र समितीची ताकद महाराष्ट्रात वाढत आहे तसेच भारत राष्ट्र किसान समितीचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी शेतकऱ्याचा हिताचा पक्ष असून आपकी बार किसान सरकारचा नारा
 देत पक्ष गावागावात काम करत असल्याचे मत व्यक्त केले तर नुकतेच नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केलेले संतोष माने यांनी तेलंगाना विकास मॉडेल हे शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारे असून गंगापूर खुलताबाद तालुक्यातही तेलंगणाच्या धरतीवर विकास साधण्यासाठी बी आर एस ची ताकद वाढवणार असून 24 एप्रिल रोजी होणारी  सभा ऐतिहासिक होणार असून गंगापूर तालुक्यातून सभेला २० हजार कार्यकर्ते जाणार असल्याचे सांगितले

 तेलंगणात शेतकरी आत्महत्या नाहीत.                                     

२०१४ मधे तेलंगणा राज्याची निर्मिती झाली.अवघ्या ८/९वर्षात तेलंगाणाचे *मुख्यमंत्री के.सी.आर* यांनी शेतकरी,कष्टकरी,मध्यमवर्गीय लोकांसाठी विशेष योजना राबवून तेलंगणा राज्य समृद्ध केले आहे.                                                                             

१) शेतकऱ्यांना २४ तास   मोफत विज.
२) पेरणीसाठी अगोदर एकरी १०,००० रू.मदत.
३) नदी जोड प्रकल्पामुळे १०० टक्के क्षेत्र सिंचनाखाली.
४) शेतकऱ्याचा मृत्यु झाल्यास ( अपघाती किंवा नैसर्गीक) कुटुंबीयांना ५,००,०००-रू.ची तात्काळ मदत.
५) सरकार स्वतः धान्य खरेदी करते.
६) दुःखद व आकस्मिक प्रसंगासाठी १०० टक्के प्रिमियम देणारी विमा योजना सरकार स्वतः राबवते.
७) शेतकरी मंच योजनेद्वारे ५००० एकर चा एक समुह करून त्यासाठी एक स्वतंत्र कृषी अधिकारी काम करतो.
८) कल्याण लक्ष्मी व शादी मुबारक योजने अंतर्गत मुलींच्या लग्नासाठी १,००,१००/-रू.विना अट तात्काळ मदत.
९) जेष्ठ नागरिकांना व एकट्या स्रियांना दरमहा २०१६ रू.पेन्शन.
१०) दिव्यांगासाठी दरमहा ३०१६ रू.पेन्शन.                                                       
११) गरीब,गरजु लोकांना १०० टक्के अनुदानावर २बेडरूम किचन घरे दिली जातात.                                                                     
१२) दलीत व आदिवाशींना उद्योग करणाय्रांसाठी  प्रोत्साहन योजना.                                                                                                             
१३) दलितांना प्रत्तेक कुटुंबास विना परतफेड १० लाख रू. एक रकमी दिले   जातात.                                                                         
१४) धनगर बांधवांना पाळण्यासाठी मोफत मेंढ्या वाटप केल्या जातात.
१५) मिशन भगीरथ अंतर्गत शेतीला सिंचनासाठी मुबलक पाणी तर पिण्यासाठी प्रत्येक घरात नळ,स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा.
१६) गरोदर  व स्तनदा मातांसाठी मोफत सर्व आरोग्य सुविधा.बाळाच्या जन्मानंतर  १२००० रू.तर मुलीच्या जन्मानंतर १३००० रू.संगोपनासाठी दिले जातात.                                       
१७) कंटी वेलमु जगातील सर्वात मोठे नेत्र शिबीर राबवले.
१८) आपले गाव आपली शाळा शिक्षण योजना राबवून शिक्षणावर भर.
यामुळे तेलंगणा एक समृद्ध राज्य झाले आहे.शेतकरी समृद्ध झाल्याने एकही आत्महत्या नाही.महाराष्ट्र राज्य तर नैसर्गीकरीत्या  समृद्ध आहे.वरील सर्व गोष्टी महाराष्ट्रात करणे सहज शक्य आहे.पण राज्यकर्त्यांची तशी मानशीकता नाही.  म्हणुन तमाम शेतकरी पुत्रांनी कष्टकय्रांनी आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी बेगडी प्रेम दाखवणाय्रा सर्वच पक्षांना विचारले पाहिजे की, जे तेलंगणात होवू शकते ते महाराष्ट्रात का नाही?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!