जिल्हा परिषद उच्च प्रा. शा. सिरसगाव केंद्र.मालुंजा शाळेचे घवघवीत यश .प्रज्ञावंत निवड चाचणी परीक्षेत स्नेहल सिरसाट हिने प्रथम तर आयशा शेख हिने द्वितीय क्रमांक पटकावला.


गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रज्ञावंत निवड चाचणी परीक्षेत स्नेहल सिरसाट हिने प्रथम तर आयशा शेख हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
४ नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रज्ञावंत निवड चाचणी परीक्षा २०२३-२४ या तालुकास्तरीय परीक्षेमध्ये गंगापूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे निवड झालेल्या मध्ये प्रथम क्रमांक स्नेहल अशोक सिरसाट
(मालुजा बु)६९ गुण,
द्वितीय क्रमांक आयशा अलिम शेख (गंगापूर नं-२) ६३ गुण ,तृतीय क्रमांकांने आदिती भास्कर सोनवणे (गाजगांव) ६१ गुण,तेजस्विनी मनसुब कन्हाळे (लासूर स्टेशन) ६१ गुण,भक्ती संजय भुजाडे (कायगाव) ६१ गुण,जयेश नंदुसिंग कहाटे (शिल्लेगाव) ५९ गुण,पायल दत्तात्रय जाधव (जामगाव) ५९ गुण,आरव बालाजी केंद्रे (ढोरेगाव) ५८ गुण,दिव्या बाबासाहेब नरोडे (रांजणगाव पोळ) ५७ गुण,वैशाली नंदकिशोर चोरमारे (अंबेलोहळ) ५६ गुण मिळाले आहे त्यात स्नेहल अशोक सिरसाट हिने प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.या परीक्षेसाठी कळसकर ,नजन ,चौधरी ,काकडे व मुख्याध्यापक इंगोले यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल सर्व शिक्षक वृंद,पालक व गावकरी यांनी स्नेहल चे अभिनंदन व कौतुक करत ,शाळेच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले व जिल्हास्तरीय परीक्षेसाठी तिला शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!