गंगापूर तालुक्यातील बियाणेचा काळा बाजार थांबवा वअवैध विक्री प्रतिबंध करणारा कायदा करा. शेतकरी कृती समिती ता गंगापूरची कृषीमंत्र्यांना मागणी

गंगापूर तालुक्यातील बियाणेचा काळा बाजार थांबवा वअवैध विक्री प्रतिबंध करणारा कायदा करा. शेतकरी कृती समिती ता गंगापूरची कृषीमंत्र्यांना “मागणी*
गंगापूर (प्रतिनिधी)खते व बी बियाणेचा काळाबाजार करणार्या औरंगाबाद जिल्ह्यातील व्यापार्यांची २०१९ पासून चौकशी करण्यात यावी तसेच गाव,तालुका, जिल्हा पातळीवर शेतकरी नियंत्रण समिती स्थापन करून खते व बी बियाणेचा काळा बाजार व अवैध विक्री प्रतिबंध करणारा कायदा करा. शेतकरी कृती समिती ता गंगापूरची कृषीमंत्र्यांना मागणी

कृषी मंञी धनंजय मुंडे,आ.सतीश चव्हाण यांना शेतकरी कृती समितीच्या इंजी महेशभाई गुजर,राहुल ढोले पाटील,विठ्ठल कुंजर,संतोष भंडारे,बबन तुबारे,रोहन परमेश्ववर*यांच्या वतीने ३ ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की स्थानिक गुन्हे शाखा नाशिक यांनी दिनांक २५.७.२०२३ रोजी निफाड पोलीस स्टेशन अंतर्गत युरिया खताचे अनधिकृत वाहतूक करणारा ट्रक पकडल्याने व विभागीय गुण नियंत्रण निरीक्षक, विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक यांनी दिलेल्या माहिती नुसार श्री. ए. एल. काळूसे खत निरीक्षक तथा तंत्र अधिकारी (गु.नि.), विभागीय कृषी सहसंचालक, औरंगाबाद, श्री. प्रशांत पवार, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद, श्री. जी. डी. सरकलवाड खत निरीक्षक तथा जिल्हा गुण नियंत्रण निरक्षक, औरंगाबाद यांचे पथक मे. शेलार अॅग्रो अँड मोटार मशिनरी, लासूर स्टेशन, ता. गंगापूर जि. औरंगाबाद येथे दाखल होऊन तपासणी केली असता सदर तपासणीमध्ये खालील त्रुटी आढळून आल्या.

१) नोंदणी प्रमाणपत्रामध्ये दुकानात विक्रीस ठेवण्यात आलेल्या सर्व उत्पादक स्तोत्र समावेश केला नाही.

२) रासायनिक खत साठवनुकीसाठी गोदामाचे ठिकाण नोंदणी प्रमाणपत्रात समाविष्ठ केले नाही.

३) साठा रजिस्टर मधील शिल्लक साठी व प्रत्यक्ष शिल्लक साठा जुळत नाही.

४) रा.खत विक्रीचा मासिक प्रगती अहवाल नोंदणी प्राधिकारी यांना दरमहा पाठविला जात नाही.
५) खाऊक विक्री प्रमाणपत्र नसताना कृषी सेवा केंद्राला विक्री केली आहे. यामुळे युरिया १९२.२८ मे.टन. ११,३६,६१८/- रु किमतीचे व इतर NPK खते १७८ मे. टन ४५,३१,३०३/-रु किमतीचे साठयाला विक्रीबंद आदेश दिले. त्या अनुषंगाने खत विक्री परवान्यावर कायदेशीर कारवाई करून संबधीत विक्री केंद्र धारकाची परवाना दि.२६.७.२०२२ रोजी पुढील आदेशा पर्यंत निलंबीत करून दिनांक २८.७.२३ रोजी सुनावनीसाठी बोलवले.

स्थानिक गुन्हे शाखा नाशिक यांनी पोलीस स्टेशन निफाड अंतर्गत दाखल केलेल्या गुन्हा क्र. ०२९० दिनांक २६.७.२०२३ मध्ये तपास करत असताना त्यांचे पथक दिनांक २७.७.२०२३ रोजी मे. शेलार अॅग्रो अँड मोटार मशिनरी, लासूर स्टेशन ता. गंगापूर जि. औरंगाबाद येथे आले होते. त्यावेळी श्री. ए. एल. कानूशे खत निरीक्षक तथा तंत्र अधिकारी (गु.नि.), विभागीय कृषी सहसंचालक, औरंगाबाद व श्री. जी. डी. सरकलवाड, खत निरीक्षक तथा जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक, औरंगाबाद यांच्या समक्ष संबंधीत गुन्ह्यातील आरोपी संतोष भाऊराव वारुळे यांनी मे. शेलार अॅग्रो अँड मोटार मशिनरी, लासूर स्टेशन ता. गंगापूर जि.औरंगाबाद यांच्या गोदामातून ५५० युरियाच्या गोण्या नेल्या असे कबुल केले. तसेच शेलार अॅग्रो अँड मोटार मशिनरी चे मालक श्री. रामदास शेलार यांचा मुलगा श्री अमोल रामदास शेलार यांनी फोने पे वर आरोपी संतोष भाऊराव वारुळे यांच्याकडून पैसे घेऊन ५५० युरियाच्या गोण्या त्यांना विक्री केल्याचे कबुल केले. मे. शेलार अॅग्रो अँड मोटार मशिनरी, लासूर स्टेशन ता. गंगापूर जि. औरंगाबाद यांच्या गोदामातील युरिया खताच्या गोण्यावरील बॅच नंबर व पोलिसांनी गुन्ह्या मध्ये जप्त केलेल्या युरिया खताच्या गोण्यावरील बॅच नंबर हे एकच असल्याचे आढळून आले. यावरून असे सिद्ध झाले की, मे. शेलार अॅग्रो अँड मोटार मशिनरी, लासूर स्टेशन ता. गंगापूर जि. औरंगाबाद यांनी शेतपिकासाठी वापरले जाणारे अनुदानित युरिया खताची काळ्या बाजारात विक्री करून शेतकरी व शासनाची फसवणूक केली.

यामुळे दिनांक २८.७.२३ रोजी सुनावनी घेऊन यामध्ये संबंधित विक्रेत्याचा परवाना क्र. LAFD१५०३०२५६४ हाजा.क्र./जि.अ.कृ.अ./गुनि/३६८७/२०२३ दिनांक३१.७.२०२३ अन्वये कायमस्वरूपी रद्द केला आहे. संबंधित विक्रेत्याकडील शिल्लक असलेला व विक्रीबंद केलेला खत साठा पुढील तीस दिवसात कृषि विभागाने नेमून दिलेले अधिकारी / कर्मचारी यांचे समक्ष शेतकऱ्यांना विक्री करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.तसेच श्री. ए. पी. गवळी, खत निरीक्षक तथा कृषि अधिकारी, पंचायत समिती गंगापूर, यांनी दिनांक 24/07/2023 रोजी मे. आदिनाथ कृषी सेवा केंद्र, लासूर स्टेशन, ता. गंगापूर जि. औरंगाबाद यांची तपासणी केली असता सदर तपासणी मध्ये त्यांनी खतनियंत्रण आदेश 1985 नुसार त्रुटी आढळुन आल्या. तसेच मे. आदिनाथ कृषी सेवा केंद्र, लासूर स्टेशन, ता. गंगापूर जि. औरंगाबाद यांनाही ह्या गुन्ह्यामध्ये आरोपी म्हणून अटक केल्याचे समजले, त्या अनुषंगाने दिनांक 30/07/2023 रोजी श्री. ए. एल. काळूशे खत निरीक्षक तथा तंत्र अधिकारी (गु.नि.) विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद व श्री. जी. डी. सरकलवाड खत निरीक्षक तथा जिल्हा गुण नियंत्रण निरक्षक, औरंगाबाद हे तपासणी साठी या कृषि सेवा केंद्रात दाखल झाले असता सदरील कृषी सेवा केंद्र बंद आढळून आले त्यामुळे सदरील कृषी सेवा केंद्राची तपासणी होऊ शकली नाही. गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासणी होणे आवश्यक आहे. तसेच 24/07/2023 रोजी तपासणी अहवालानुसार यांनी खत नियंत्रण आदेश 1985 मधील तरतुदीचा भंग केला असून परवान्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन केलेले आहे. त्यामुळे संबंधित विक्रेत्याचा परवाना क्र.LAFD15030012 पुढील आदेशापर्यंत निलंबीत करून त्याची सुनावण दिनांक 03/08/2023 रोजी सकळी 10 वाजता होणार आहे.

या निवेदनाच्या माध्यमातून आपणास विनंती करण्यात येते की सदरील प्रकरणीतील काळा बाजार करणार्या व्यापार्याची वेळोवेळी तपासणी करणे अपेक्षित होते.परंतु जिल्हा कृषी प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची तपासणी झाली नसल्याने वरील खतांची विक्री काळा बाजार झाली आहे.औरंगाबाद जिल्ह्यात खतांची कृञीम टंचाई निर्माण करून २०१९ पासुन असे प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात खते व बी बियाणे विक्री झालेले आहेत याची सखोल चौकशी करून संबधीत अधिकारी यांचे वर सुद्धा कर्तव्य कसुरी केल्या प्रकरणी चौकशी करण्यात यावी.असे प्रकार भविष्यात होऊ नये म्हणून गाव,तालुका, जिल्हा पातळीवर शेतकरी नियंत्रण समिती तयार करून खते व बी बियाणेचा काळा बाजार, अवैध विक्री प्रतिबंध करणारा कायदा करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!