छत्रपती संभाजीनगरच्या संस्थान गणपती गोविंद पथकाने सहा थर लावून दहीहंडी फोडुन प्रथम क्रमांक पटकावला…अमोल जगताप आयोजित दहीहंडी महोत्सव ‘ मोठ्या उत्साहात साजरी…

छत्रपती संभाजीनगरच्या संस्थान गणपती गोविंद पथकाने सहा थर लावून दहीहंडी फोडुन प्रथम क्रमांक पटकावला…*
अमोल जगताप आयोजित दहीहंडी महोत्सव ‘ मोठ्या उत्साहात साजरी…


गंगापूर (प्रतिनिधी)
गंगापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते अमोल जगताप मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद मैदानावर आयोजित दहीहंडी’ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या दहीहंडीचे उद्घाटन १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, व पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या हस्ते करण्यात आले.


‘गोविंदा आला रे आला’,’बोल बजरंग बली के जय’च्या तालावर गोविंदा पथके थिरकल्याचे पाहायला मिळाले… .
छत्रपती संभाजीनगर येथील संस्थान गणपती गोविंद पथकाने सहा थर लावून दहीहंडी फोडली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडणाऱ्या मंडळाला मानाचे चषक व संतोष अंबिलवादे यांच्या वतीने ७१ हजारु रुपयाचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. द्वितीय पारितोषिक चाळीसगावच्या राहुल पॉइंट जिद्दी ग्रुप, गोविंदा पथकाला मानाचे चषक व जितु भाऊ दहातोंडे यांच्या वतीने,३१ हजार रुपयाचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच
तृतिय पारितोषिक छत्रपती संभाजीनगर येथील संत रोहिदास महाराज गोविंदा पथकाला मानाचे चषक व तुकाराम सटाले यांच्या वतीने,२१ हजार रुपयाचे पारितोषिक रोख देऊन गौरविण्यात आले तसेच दहीहंडी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी शहरातील व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तुझ्यात जीव रंगला फेम,अप्सरा आली विजेत्या सुप्रसिद्ध माधुरी पवारने आपल्या दिलखेचक अदांसह नृत्य सादर करत गोविंदाचा उत्साव वाढवला.तसेच महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था ही करण्यात आली होती.दहीहंडी पंच म्हणून डॉ उद्धव काळे यांनी काम पाहिले, व सूत्रसंचालन जयेश निरफळ यांनी केले.या ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले,
पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले स.पो.नि नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक, शखिल शेख, पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख, पोलीस उपनिरीक्षक दिपक औटे, प्रमोद काळे, गुप्तचर विभागाचे मनोज नवले, भागवत खाडे, अमोल कांबळे, राहुल वडमारे, अभिजित डहाळे, आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी
चोख बंदोबस्त ठेवला होता.


तसेच दहीहंडी महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी, दही हंडी उत्सव समिती अध्यक्ष पै निलेश शेळके,स्वप्नील गायकवाड , राहुल साळवे,सागर घोडके, विशाल टिके , आकाश बुचडे, सुमित साबणे , अजय दाहातोंडे , मनोज राऊत
यांच्यासह अमोल दादा जगताप मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!