गंगापूर व लासुर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समित्या ताब्यात येणार आमदार बंब


गंगापूर (प्रतिनिधी) जेवणावळीवर लाखों रुपये लाटणा-या विरोधकांना मतदार धडा शिकविणार असुन गंगापूर व लासुर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समित्या भाजप शिवसेनेच्या ताब्यात येणार आमदार प्रशांत बंब

लासूर स्टेशन आणि गंगापूर या दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समित्या आमच्याच ताब्यात येणार असून शेतकऱ्यांच्या असलेल्या बाजार समित्या विरोधकांच्या ताब्यात गेल्या तिस वर्षांपासून होत्या त्यांनी तर या बाजार समीत्याचे अड्डे बनवले हे सर्व अड्डे समुळ नष्ट करायचे आहे .
विषेश म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला बाजार समित्या मध्ये चागंला भाव मिळायला पाहिजे ताब्यात असलेल्या बाजार समीत्या मधील क्लार्क, शिपाई त्यांच्या घरी कामे करायची जेवणाच्या पैस्याचे बिले लावून हजारो रुपये काढत असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रशांत बंब यांनी बोलताना सांगितले

बाजार समितीच्या निवडणूकी संदर्भात ऊमेदवार कार्यकर्त्यांची गंगापूर येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार बंब बोलत होते.
पुढे बोलताना बंब म्हणाले गंगापूर सहकारी साखर कारखाना कवडी मोल भावात पंचवीस वर्ष भाड्याने गेला सहकार क्षेत्रात जी सवलत मिळते ती आता मिळणार नाही .
यावेळी आमदार प्रशांत बंब, किशोर धनायत ,शिवनाथ मालकर,जिप सदस्य मधुकर वालतुरे, प्रदीप भैया पाटील ,मारुती खैरे,शिंदे गटाचे,दिलीप निरपळ, अरुण रोडगे, रज्जाक पठाण, गोपाल वर्मा, अतुल रासकर,कृष्णकांत व्यवहारे,प्रशांत मुळे ,आदी ऊपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!