गंगापूर वैजापूर तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करण्यासाठी भाकरी खाऊन शेतकऱ्याकडून सरकारचा निषेध करत काळी दिवाळी साजरी.

गंगापूर)प्रतिनिधी)संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळीची धामधूम सुरू असून सर्वत्र आनंद उत्सव साजरा होत असताना यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी ठरत आहे.

यावर्षी सरासरीपेक्षाही कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. सरकारने मदत जाहीर करताना सरकारने सारासर विचार न करता सदृश्य दुष्काळ यादी जाहीर केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे सणासुदीला गोडधोड न करता शेतकऱ्यांनी शेतात आमटी भाकरी खाऊन प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

तालुक्यासह सगळीकडे सरासरी पेक्षाही कमी पाऊस झाल्याने संपूर्ण तालुक्यात दुष्काळ परिस्थिती असताना कोरडा दुष्काळ जाहीर होणे अपेक्षित होते असे असतानाही तालुक्यातील काही मंडळ दुष्काळ यादीतून वगळण्यात आल्याने तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले असून संपूर्ण तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिवाळीच्या दिवशी शेतात जाऊन आमटी भाकरी खाऊन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे .

गंगापूर जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी पर्जन्यमान ७५ टक्के पेक्षा कमी व एकूण पावसाच्या ७५० मीमी पेक्षा कमी पाऊस अशा तालुक्यातील १२ महसूल मंडळांपैकी ८ मंडळात राज्य शासनाकडून १० नोव्हेंबरला दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. मात्र, गंगापूर तालुक्यात सर्वत्र सारखाच पाऊस पडलेला असताना इतर चार मंडळांना कोणत्या निकषावर वगळले? असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करीत आहेत.

यावेळी भाऊसाहेब शेळके, संपत रोडगे, अनंता भडके, ऋषिकेश मनाळ, साईनाथ मनाळ, भरत मनाळ, केदार मनाळ, सुदाम दारूंटे, रमेश मनाळ, प्रकाश मनाळ, हरिश्चंद्र मनाळ, रवींद्र मनाळ, लक्ष्मण गोरे, विठ्ठल शिंदे, काका कुलकर्णी, कैलास घोडके, नितीन सर, नितीन मनाळ, लहानू मनाळ, किरण मनाळ, संजय पगारे, गोकुळ शिंदे, रमेश हिवाळे, कैलास घोडके, गणेश मनाळ, संजू आहेर, दत्तू तगरे, नरेंद्र मनाळ, आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!