गंगापूर येथे संभाजी भिडे गुरुजी यांच्या कार्यक्रमाच्या आयोजक व संयोजकावर पोलिसांनी केले गुन्हे दाखल

गंगापूर येथे संभाजी भिडे गुरुजी यांच्या कार्यक्रमाच्या आयोजक व संयोजकावर पोलिसांनी केले गुन्हे दाखल
गंगापूर (प्रतिनिधी) शहरात परवानगी नसताना संभाजी भिडे गुरुजी यांचा शिवचरित्र आणि हिंदवी स्वराज्य या विषयावर व्याख्यान झाल्यामुळे कार्यक्रमाचे चार आयोजक व संयोजकावर गंगापूर पोलीसांनी गुन्हे दाखल केले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संभाजीराव भिडे गुरुजी यांची गुरुवारी २० जुलै २०२३ रोजी गंगापूर येथील लासुरनाक्यावरील राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे सायंकाळी पाच वाजता शिवचरित्र आणि हिंदवी स्वराज्य या विषयावर व्याख्यान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गंगापूर , छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या आयोजकांना पोलिसांनी परवानगी नाकारली होती तरीही हा कार्यक्रम घेण्यात आल्याने भिडे यांना विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या संघटनेचे कार्यकर्ते आणि आंबेडकर अनुयायींनी मोठी गर्दी केली होती मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आल्याने आंदोलकांना कार्यक्रमास्थळी जाण्यापासून रोखण्यात आले होते.आंदोलकांकडून लासुरनाक्यावर आंबेडकर अनुयायींनी धरणे धरुन जोरदार घोषणाबाजी करत भिडेचा निषेध व्यक्त करण्यात येवून आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती त्यानुसार गंगापूर पोलीसांनी आयोजक मोहीत कुलकर्णी,आकाश शहाणे,गोवींद जाधव व आकाश जाधव या चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका एच सी घोडके हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!