गंगापूर येथील प्रकार बनावट गावठाण प्रमाणपत्रा आधारे केलेले खरेदीखत रद्द करण्यात येवून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तलाठी यांनी केली


गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथील तलाठी कार्यालयाचे व मंडळ अधिकारी यांचे बनावट शिक्के तयार करून गावठाण प्रमाणपत्र बनवून खरेदीखत तयार करणाऱ्या विरोधात कारवाई करुन खरेदीखत रद्द करण्यात यावे अशी मागणी तलाठी यांनी केली आहे.

तहसीलदार सतीश सोनी यांना शेणपुंजी रांजणगावचे तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की रांजणगाव शे.पु. येथील अशोक चांगदेव थोरात यांनी मिळकत क्र. ८३९० ही जागा गावठाण हद्दीत येत नसूनही सदर व्यक्तीने खोट्या सही व शिक्क्याच्या आधारे खोटे गावठाण प्रमाणपत्र तयार करून खरेदी दस्त क्र.२५५२/ २०२४ दुय्यम निबंधक गंगापूर येथील कार्यालयात दि. २५ एप्रिल २०२४ रोजी खरेदी खत तयार केल्याचे आढळून आले आहे. तसेच याच प्रकारे कुंडलिक मच्छिंद्र गवळी यांनी सुद्धा याच प्रकारे खोटे सही शिक्याचे गावठाण प्रमाणपत्र तयार करून दस्त क्र. ४६४/२०२४ नुसार खरेदी खात तयार केल्याचे आढळून आले असुन गेल्या अनेक वर्षांपासून ते ०६ जुन २०२४ पर्यंत मौजे रांजणगाव शे.पु. येथे एकही गावठाण प्रमाणपत्र वितरीत करण्यात आलेले नाही. तरी याप्रकारे अजून खोटे प्रमाणपत्र देऊन खरेदी झालेली असल्यास ते सर्व खरेदी खत रद्द करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेशित करण्याची मागणी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!