गंगापूर येथील छत्रपती शिवाजीनगरमध्ये श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व कळशारोहन सोहळा उत्साहात संपन्न.

गंगापूर येथील छत्रपती शिवाजीनगरमध्ये श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व कळशारोहन सोहळा उत्साहात संपन्न.


गंगापूर ( प्रतिनिधी ) शहरातील छत्रपती शिवाजीनगर येथे श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व कळशारोहण सोहळा तीन दिवस २६ ते २८ ऑगस्ट पर्यंत विधिवत पूजा करून सावखेडा येथील गिरी आश्रमाचे ह.भ.प.कैलासगिरीजी महाराज यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कळशारोहण करण्यात आले.
या प्रसंगी कैलासगिरीजी महाराज यांचे प्रवचन झाले. वेद शास्त्र संपन्न आचार्य विजू गुरुजी धुमाळ यांच्या कडून विधिवत पूजा व यज्ञ याग संपन्न झाला.या वेळी गंगापूर खुलताबाद मतदार संघाचे आमदार प्रशांत बंब,नगरसेवक भाग्येश गंगवाल ,अविनाश पाटील, रामेश्वर मुंदडा,मारुती खैरे, आबासाहेब शिरसाठ, गोपाल वर्मा,अतुल रासकर ,ज्ञानेश्वर साबणे, ॲड कृष्णा ठोंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होते. या कार्यक्रमाचे आयोजन बि जी कुलकर्णी ,रघुनाथ धोत्रे, भाऊसाहेब बारहाते, रमाकांत बन्सोड ,योगेश धस, बबनराव जगताप, विष्णुपंत कोरडे, उदे , प्रशांत कुलकर्णी, कमलेश धस, सतीश चव्हाण, आदिनाथ आगळे, निर्मल जैस्वाल, काकासाहेब कुमावत, देवळाणकर सर, योगेश भोगे, अप्पासाहेब सोनवणे, कल्याण बारहाते ,किशोर निसळ, दीपक म्हस्के, रवींद्र बारहाते, आघाडे सर, शुभम चव्हाण आदींनी करुन परिश्रम घेतले. मंदीरासाठी भरतसिंग राजपूत यांनी जागा दान दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!