काटेपिंपळगाव येथे पशुसंवर्धन विभागामार्फत लम्पी आजारावरील प्रतिबंधक लसीकरण

काटेपिंपळगाव येथे पशुसंवर्धन विभागामार्फत लम्पी आजारावरील प्रतिबंधक लसीकरण

गंगापूर (प्रतिनिधी)
माझा गोठा स्वच्छ गोठा या उपक्रमा अंतर्गत लम्पी आजारावरील प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले पशुसंवर्धन विभागाचे डॉ जि. बी. बनकर यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शक केले
गंगापूर तालुक्यातील काटेपिंपळगाव येथे पशुसंवर्धन विभागामार्फत लम्पी आजारावरील प्रतिबंधक लसीकरण बाबत मार्गदर्शक करून गावातील जनावरांना लसीकरण करण्यात आले.यावेळी डॉ बनकर बोलत होते.
कापूस पीकामधे अंतर पीक घेतल्यास याचे काय फायदे असल्याचे सेवा संस्थेचे (पीएससीपी) अँग्रोनिमीस सुनील चव्हाण यांनी शेतकऱ्यांना जैविक खते, अमृत पाणी ,दशपरणी औषध कसे तयार करायचे याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक काटेपींपळगांवच्या मा सरपंच मनीषा कृष्णकांत व्यवहारे यांनी केले प्रास्ताविकते मध्ये सरपंच मनीषा व्यवहारे यांनी सांगितले की पावसाळ्यात पाळीव जनावरांना लसीकरण करून घ्यावे तसेच शेतकऱ्यांनी शेतात पीकावर फवारणी करतांना सुरक्षित कीटचा वापर करून फवारणी करण्याचे आवाहन करण्यात आले.
डॉ अमोल धोत्रे, डॉ गणेश धोत्रे, कृष्णकांत व्यवहारे, ऊपसरपंच प्रकाश पिंपाळे, कैलास संतराम धोत्रे, भाऊराव पवार, आण्णा सोनवणे, संजय सोनवणे, फकिरचंद राऊत, एन. टी. सोनवणे, व्यकंट धोत्रे, पंकज सुरासे, कारभारी धोत्रे, ज्ञानेश्वर मोरे, बाबा राऊत, बाबासाहेब पुंडलिक धोत्रे,बाबासाहेब पिंफाळे, काशीनाथ धोत्रे, बापू धोत्रे,
भाग्यश्री धोत्रे, आशाबाई राऊत, सविता धोत्रे, वालुबाई पवार, वच्छलाबाई घुले, शारदा पवार, नंदाबाई जगताप, शशीकला राऊत,आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!