आपला दवाखान्याला लागली घरघर.. डॉक्टर गायब रुग्णांचे झाले हाल.. तहसीलने केला पंचनामा

आपला दवाखान्याला लागली घरघर.. डॉक्टर गायब रुग्णांचे झाले हाल..
तहसीलने केला पंचनामा


गंगापूर (प्रतिनिधी)हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये डॉक्टर गैरहजर असल्याने तहसील कार्यालयाने पंचनामा केला असून डॉक्टर नसल्याने अनेक रुग्णांना उपचार न घेता वापस जावे लागले.
काही दिवसांपूर्वी आपला दवाखाना म्हाडा कॉलनी येथे स्थलांतरित करून सुरू केला परंतु सध्या या दवाखान्यात बि ए एम एस डॉक्टर रुग्णांवर उपचार करत होते परंतु गेल्या दोन दिवसांपासून हे डॉक्टरच आपल्या दवाखान्यात फिरकत नसल्याची माहिती आमदार प्रशांत बंब यांचे सचिव कृष्णकांत व्यवाहारे व अतुल रासकर यांना मिळाली असता त्यांनी तहसीलदार सतीश सोनी यांना या घटनेची माहिती दिल्याने त्यांनी तलाठी गणेश लोणे यांना पंचनामा करण्यासाठी पाठविले लोणे यांनी पंचनामा केला असता डॉक्टर आले नसल्याचे तेथे उपस्थित असलेल्या ब्रदर महेश ठोंबरे व लॅब टेक्निशियन सुशांत कदम यांनी सांगितले या दवाखान्यात गेल्या दोन दिवसांपासून गोरगरीब रुग्णांना उपचार न घेता वापस जावे लागत असल्याचा पंचनामा करण्यात आला आहे या पंचनाम्यावर कृष्णकांत व्यवाहारे,रुग कल्याण समिती सदस्य अतुल रासकर, गौतम खाजेकर, अलका खाजेकर,सिमा किर्ती नाही आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!