उत्तर भारतात पावसाचा हाहाकार! गावं बुडाली, संसार उघड्यावर; घरे, गाड्या, रस्ते गेले वाहून

उत्तर भारतात पावसाचा हाहाकार! गावं बुडाली, संसार उघड्यावर; घरे, गाड्या, रस्ते गेले वाहून

शिमला(प्रतिनिधी) : हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने थैमान घातलं असून गावच्या गावं वाहून गेल्याच्या थरारक घटना घडल्या आहेत. या पुरामुळे येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे लोकांची मोठी अडचण झाली आहे. तर या घटनेचे थरारक व्हिडिओ समोर आले आहेत.

हिमाचलमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे १३ पूल, तर ४५ वाहनं वाहून गेली आहेत. तर मनाली येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाड्या पाण्यात वाहून गेल्या. व्यास नदीवरील पूलही वाहून गेल्याची माहिती आहे. तर हिमाचलमध्ये हिमस्खलन होऊन एका गावात मोठ्या प्रमाणात गाळमिश्रीत पाण्यासहित लाकडेही आल्याची घटना घडली आहे.
हिमाचलमधील मंडी येथील थुनाग या गावातील एक व्हिडिओ समोर आला असून हे दृश्य पाहून तुमचा थरकाप उडेल. या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी घुसले असून यामध्ये घरे उध्वस्त झाली आहेत. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये महामार्गावरील पूल कोसळल्याचं दिसत आहे.

पावसाने घातलेल्या थैमानात गाड्या, घरे, सामान वाहून गेल्याच्या घटना घडल्या असून अनेक संसार उघड्यावर आले आहेत. तर सुरक्षा जवानांकडून मदतकार्य केले जात आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी, मुसळधार पावसामुळे पर्यटकांनाही अशा ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांनी या काळामध्ये फिरायला जाताना काळजी घ्यायला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!