आ.सतीश चव्हाण यांच्या पाठपूराव्याला यशढोरेगाव जि.प.शाळेच्या वर्ग खोल्या बांधकामासाठी 81 लक्ष रू. निधी मंजूर

आ.सतीश चव्हाण यांच्या पाठपूराव्याला यश
*ढोरेगाव जि.प.शाळेच्या वर्ग खोल्या बांधकामासाठी ८१ लक्ष रू. निधी मंजूर*
गंगापूर – तालुक्यातील ढोरेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची संपूर्ण इमारत मोडकळीस आलेली असून सदरील शाळेच्या नवीन इमारत बांधकामासह आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी आमदार सतीश चव्हाण शासनस्तराव वेळावेळी पाठपूरावा करीत होते. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून समग्र शिक्षा वार्षीक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन 2023-24 मध्ये या शाळेत नवीन 6 वर्ग खोल्या बांधकामासाठी 81 लक्ष रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे आज (दि.09) आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.

16 सप्टेंबर 2022 रोजी आ.सतीश चव्हाण यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालकांना ढोरेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण होऊन मोडकळीस असून सदरील वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसविणे जोखमीचे व धोकादायक असल्याचे पत्राव्दारे निदर्शनास आणून देत सदरील शाळेच्या इमारत बांधकाम व इतर सोयीसुविधांकरिता त्वरित आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी होती. तसेच 11 डिसेंबर 2018 रोजी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना पत्राव्दारे इमारतीच्या मोडकळीसंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली होती. 7 मार्च 2022 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील आ.सतीश चव्हाण यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प समन्वयक समीर सावंत यांनी 5 जुलै 2023 रोजी परिपत्रक काढून समग्र शिक्षा या योजनेंतर्गत बांधकाम विषयक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये धोकादायक/मोडकळीस आलेल्या राज्यातील 19 वर्गखोलीच्या ठिकाणी नवीन वर्गखोली बांधकामांना रू.256.50 लक्ष तरतूद करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेच्या 6 वर्गखोल्यांचे नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी 81 लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना लवकरच नवीन खोल्यांमध्ये ज्ञानदानाचे धडे गिरवता येतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!