अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविणाऱ्या नराधमाला वाळूज पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविणाऱ्या नराधमाला वाळूज पोलिसांनी ठोकल्या बेड्या..
वाळूज (प्रतिनिधी) दीड वर्षा पूर्वी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेवून अत्याचार करणाऱ्या आरोपीस वाळूज पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील माठ येथे छापा टाकून बेड्या ठोकल्या आहे.
ही घटना दोन जानेवारी २०२२ रोजी शेंदूरवादा शिवारात घडली होती. याप्रकरणी मुलीस फूस लावून पळविल्या बद्दल अज्ञात आरोपी विरोधात दहा फेब्रुवारी २०२२ रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरज सोमीनाथ शिंदे रा. दिनापूर ,ता. पैठण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वीट भट्टीवर काम करत असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्य घटनेच्या दिवशी जेवण करून झोपी गेले होते. दरम्यान मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास मुलीची आई पाणी पिण्यासाठी उठली असता तिला आपली मुलगी अंथरुणावर दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही सदरची मुलगी मिळून न आल्याने तिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात अज्ञात कारणासाठी मुलीला फूस लावून सोबत पळून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि. सय्यद हनीफ , पोलीस हवालदार अभिमन्यू सानप, दशरथ खोसरे, पोलीस अंमलदार सुखदेव कोल्हे ,महिला पोलीस मयुरी तांबे यांनी माठ तालुका श्रीगोंदा ,जिल्हा अहमदनगर येथे असलेल्या एका वीट भट्टीवर छापा टाकला असता तेथे आरोपी सुरज शिंदे व याच्यासोबत पीडित मुलगी आढळून आले या दोघांना ताब्यात घेतले. याठिकाणी दोघेही काम करुन राहत होते. या दरम्यान आरोपीने तिच्यावर वेळोवेळी शरीर संबंध ठेवल्याने त्याच्या विरोधात अत्याचारसह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सय्यद हनीफ हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!