*एक आठवड्यात रायपूर येथील शेतकऱ्यांला मिळाली शासकीय मदत*
गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील रायपूर येथील शेतकरी अंबादास निकम यांच्या शेतात वीज पडून त्यांचे तीन जनावरे दगावली होती
धामोरीचे उपसरपंच रवींद्र चव्हाण यांनी आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी अंबादास निकम यांना शासनाकडून मदत मिळण्यासाठी पाठपुरावा केला व एका आठवड्याच्या आतच त्यांना आर्थिक मदत मिळवून दिली..
तहसील कार्यालयात अंबादास निकम यांना तहसीलदार सतीश सोनी यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला.
यावेळी उपसरपंच रवींद्र चव्हाण, संतोष पाटील जाधव, आप्पासाहेब पाचपुते,पंढरीनाथ चव्हाण दिलीप सिंग राजपूत, नंदकुमार गांधीले पाटील आदी उपस्थित होते
4 जून 2023 रोजी वादळी पाऊस होऊन रायपूर येथील शेतकरी अंबादास निकम यांच्या शेतामध्ये वीज कोसळून त्यांची तीन जनावरे दगावली होती आईन मशागतीच्या काळातच जनावर दगावल्याने निकम यांची मोठे आर्थिक नुकसान झाले वीज कोसळून जनावरे दगावल्याचे रायपूर येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार, गणेश देशमुख, योगेश घीतरे यांनी धामोरीचे उपसरपंच रवींद्र चव्हाण यांना माहिती देताच चव्हाण यांनी तलाठी तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क करून पंचनामा तसेच जनावरांचे शवविच्छेदन करण्यासाठी पाठपुरावा केला. त्या नंतर तहसील कार्यालय व जिल्हाधिकाऱ्यांकडे निकम यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सतत पाठपुरावा करून एका आठवड्यातच त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून दिली