चोराच्या उलट्या बोंबा गंगापूर पोलीसांचा टपरी धारकांना अजब सल्ला देवुन हप्तेखोरी झाकण्यासाठी पत्रकारा विरोधात निवेदनाचा केविलवाणा प्रयत्न

चोराच्या उलट्या बोंबा गंगापूर पोलीसांचा टपरी धारकांना अजब सल्ला देवुन हप्तेखोरी झाकण्यासाठी पत्रकारा विरोधात निवेदनाचा केविलवाणा प्रयत्न


गंगापूर (प्रतिनिधी)पोलीस ठाण्यातील कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकाची टपरी धारकांना दमबाजी करून पत्रकारा विरोधामध्ये बळजबरी निवेदन लिहून घेतले त्यामुळे सत्यजित सत्या सारखे वागा अशी म्हणण्याची वेळ पत्रकारांवर आली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की २४ ऑगस्ट रोजी एका दैनिकात मध्ये गंगापूर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्याबाबत सविस्तर बातमी छापण्यात आली होती त्या बातमी मुळे गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील काल एक पान टपरी चोरट्यांनी फोडली होती.त्या संदर्भात पोलीस ठाण्यात बैठक आयोजित केली आहे असे कारण सांगून शहरातील सर्वच पान टपरी वाल्याना पोलीसांनी टपरीवर जाऊन पोलीसस्टेशनला बोलावले होते .सर्व पाणटपरी धारक पोलीस ठाण्यात गेल्यावर व यांच्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. त्या पत्रकारांनी बातमी छापली त्याच्या घरी जाऊन त्यांना जाब विचारा व हल्लाकरा असे चिथावणीखोर वक्तव्य करून पत्रकारांच्या विरोधात भडकवले असे नाव न छापण्याच्या अटीवर अनेक टपरी धारकांनी सांगितले

प्रतिक्रिया :- शहरातील नवयुवकांनी व्यसनाधीन होऊ नये म्हणून आपण टाकलेली बातमी योग्य आहे परंतु ती कसशी खोटी बातमी आहे हे दाखवण्यासाठी काही टपरीधारकांच्या को-या कागदावर सह्या घेतल्या आहे त्यांनाही निवेदन काय लिहिले आहे हे माहीत सुद्धा नाही अशा पद्धतीने हे करणं म्हणजे शहराला एका वेगळ्या दिशेला घेऊन जाणं असा याचा अर्थ होतो आणि रमाकांत बन्सोड हे मी कधीही गुटका खाताना बघितले नाही त्यामुळे ते गुटखा उधार देत नाही म्हणून बातमी टाकतील या बोलण्यात काही तथ्य नाही. उधारीत गुटखा मागता याचा अर्थ अवैध गुटखा विक्री सुरू आहे काय असाच होतो.डाॅ आबासाहेब शिरसाठ, सचिव,


सांगा गुटक्या विकणाऱ्यांनो व टपरी वाल्यांनो मी तुमच्याकडून हप्ते घेतो काय तसे मला लिहून द्या व त्यावर आपला मोबाईल नंबर टाकून आपल्या सह्या करा. ज्या पत्रकारांनी बातम्या छापल्या त्यांच्या घरी जा व त्यांस जाब विचारा असे गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी गंगापूर शहरातील सर्वच पान टपरी, मावा विक्रेते व गुटखा विक्रेत्यांना पोलीस ठाण्यामध्ये बोलून घेऊन सांगितले.

सह परिसरातील अनेक गावात गंगापूर पोलीसांच्या मेहरबानीमुळे अनेक अवैध्य धंदे जोमात सुरू झाले असून त्यामध्ये चक्री, जुगार,केसीनो ,विनापरवाना देशी, विदेशी दारू सह गुटखा, मटका, व जुगार अड्डयांचा समावेश आहे. परिसरातील अल्पवयीन व शाळा कॉलेज मधिल तरुण या अवैध व्यवसायामुळे व्यसनाधिन होत असल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे. या अवैध धंदे करणा-यावर पोलीसांचा कोणताही वचक राहीला नसुन पोलीसांच्या हप्तेखोर धोरणामुळे सामन्य माणसाला त्रास होत असतांनाही कोणतीही तक्रार करू शकत नाही.

गंगापूर शहरांमध्ये विनापरवाना देशी दारु विक्रि करणाऱ्यानी अनेक ठिकाणी खुले आम देशी व विदेशी दारुची विक्री सुरू आहे. त्यामध्ये जुनं बसस्थानक परिसर,लासुर नाका परिसर,मोंढा रोड, नवीन बसस्थानक परिसरातील रस्त्यांवर दारू मिळत असल्यामुळे अनेक अल्पवयीन मुले दारुच्या व्यसनी गेले आहेत. याकडे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील ढोरेगाव, सावखेडा, जामगाव, जुने कायगाव,भेंडाळा भिवधानोरा अशा अनेक छोट्यामोठ्या गावासह अनेक गावात विनापरवाना देशी व विदेशी दारु विक्री केल्या जाते याकडे स्थानिक पोलीस जानिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याची ओरड परिसरातील नागरीकांधून होत आहे.याबाबत एका विनापरवाना अवैध देशी दारू विक्रेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहीती नुसार पोलीसांना प्रत्येकी मासीक हप्ता ठरवला असून गावातील नागरीकांची आमच्या बद्दल तक्रार आली तर एक केस द्यावी लागेल अशी बोलनी झाली असून, मी हप्त्या सह केसेस ही दिल्या आहेत ते सर्व सांगुनच असते त्यामध्ये केस कोणती होते ते ही सांगतात दारूचा बॉक्स जरी असला तरी फक्त पाच-सात बॉटल पोलीस आम्हाला द्यायला सांगतात ते जप्त केल्या हे दाखवण्यासाठी असते नंतर आधारकार्ड मागतात आणि ६५ ई ची केस होते ते आम्हाला सांगुनच एक केस प्रत्येकाला द्यावी लागते त्यामध्ये अटकही होत नाही फक्त कायद्यानुसार गुन्हा नोंद केला जातो. कोन्ही पोलीसांना तक्रार केलीच तर पोलीस कार्यवाही केल्याचे गावातील नागरिकांना दाखवतात अशी गंभीर स्वरूपाची माहीती पोलीसांबद्ल एका अवैध दारू विक्रेत्यांने नांव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!