सोलेगाव येथील २३ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या


गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर तालुक्यातील सोलेगाव येथील एका २३ वर्षीय युवकाने घरातील लोखंडी पाईपला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आविनाश गोरख मनाळ २३ राहणार सोलेगांव तालुका गंगापूर याने रात्रीच्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून घेतला होता

अविनाश या तरुणाची आई दोन दिवसापासून गावाला गेलेली होती. आईने रात्री व सकाळी अविनाश याला फोन केले असता फोन बंद येत असल्याने शेजारी आजूबाजूला घरी दिसला का विचारण्यासाठी फोन केले.
सकाळी आई घरी आली असता आई व बाप्पू गोरे यांस बाहेर त्यांची चप्पल दिसून आली. आवाज देऊन दरवाजा वाजून सुध्दा उघडत नसल्यामुळे खिडकीतून डोकून बघितल्यानंतर अविनाश हा गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आला त्यावेळी त्याच्या आईने आरडाओरडा केल्यानंतर शेजारच्यांनी घराकडे धाव घेतली बाप्पू गोरे यांनी दरवाजाची कडी तोडून आत मध्ये प्रवेश केला त्यानंतर तो मृत अवस्थेत दिसून आला यावेळी गावचे सरपंच संतोष पवार यांनी याबाबत गंगापूर पोलीसांना माहिती दिली असता पोलीस उपनिरीक्षक अझहर शेख बीट आमलदार विजय पाखरे अनिरुद्ध शिंदे आदींसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह  शविच्छेदनासाठी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास बीट अंमलदार विजय पाखरे हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!