सिंधीसिरजगाव येथे अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी चोरी करून रोख रक्कमेसह सोन्या चांदीचे दागिने असा एकुण ७ लाख ५७ हजार पाचशे रुपयांच्या मुद्देमाल लंपास केला


गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील सिंधीसिरजगाव व फतुलाबाद येथे अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोंडुन घरातील रोख रक्कमेसह १११ ग्रॅम सोने व १३४ भार चांदीचे दागिने असा एकुण ७ लाख ५७ हजार रुपयांच्या मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ३० मे रोजी पहाटे अंदाजे ४.३० वाजेच्यासुमारास बाळु सोनवणे यांची पत्नी नेहमीप्रमाणे झोपेतुन ऊठली असता ती मुलगा झोपलेल्या रुम मध्ये गेली असता तीला बेडरुममधील दोन लोखंडी कोठ्या अदाजे तीन ते साडे तीन फुटाच्या दिसल्या नाही त्यावेळी तीने घरातील सर्वांना झोपेतुन ऊठवले व रुमची पाहणी केली असता आम्हला दोन लोखंडी कोठ्या व एक लोखंडी पेटी दिसुन आली नसल्याने किचन मध्ये गेलो असता किचनचे दरवाजाचा कडी कोंडा तुटलेला दिसला व दरवाजा उघडा होता घराचे पाठीमागे घरामागिल मोकळ्या शेतात दोन कोठ्या व एक पेटी त्याचा कडी कोंडा तोडुन त्यातील सामान इतरत्र पडलेले दिसले कोठ्यापैकी एका कोठीमध्ये सोने, चांदी व रोख रक्कम एका स्टीलचे डब्यामध्ये ठेवलेली होते ते अज्ञात चोरांनी चोरून नेले चोरीस गेलेल्या मालाचे वर्णन खालील प्रमाणे-1)1,30,000/-रोख रक्कम ज्यामध्ये 500रु दराच्या 250 नोटा व 100 दराच्य 50 नोटा. 2) 30,000/-06 ग्रॅम वजनाची सोन्याची बादामी अंगठी जु.वा.कि.अ.
3) 10000/- दोन ग्रॅम वजनाची सोन्याची बाळी जु.वा.कि.अ. 4) 2,00,000/- चार तोळे वजनाची सोन्याची पोत जु.वा.कि.अ.
5) 25000 /- पाच ग्रॅम वजनाची सोन्याची नाकातील नथ जु.वा.कि.अ.
6) 50000/- एक तोळ वजनाची सोन्याची एकंदानी पोत जु.वा.कि.अ.
7) 45000 /- नऊ ग्रॅम वजनाची सोन्याची सेवनपिस पोत जु.वा.कि.अ. 8) 5000/- एक ग्रॅम वजनाचे कानातील सोन्यचे कुडुक 9)15000 /- तीन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या लहान मुलाच्या कानातील चार जोड बाळ्या जु.वा.कि.अ.
10)75,000 /- पंधरा ग्रॅम वजनाची डोरल्याची पोत11)25000 /- पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी
12) 3000 /-सहा भार वजनाचे चांदिचे हातातील ब्रासलेट 13)50000/- एक किलो वजनाचे चांदिचे दंडाचे दंडकडे 14) 4500/- नऊ भार वजनाचे चांदिचे चार जोड जोडवे15) 3000 /- सहा भार वजनाचे चांदिचे लहान मुलाच्या हातातील कडे 16) 3000/- सहा भार वजनाच्या चांदिच्या लहान मुलीच्या हातातील बाहुट्या 17) 1000/- दोन भार वजनाचे चांदिचे जोडवे 18) 2500 /- पाच भार वजनाचे चांदिचे पायातील पैजन एक जोड असा एकूण-6 लाख 77 हजार रुपये किंमत तसेच माझे घरापासुन साधारणपने एक की. मी अंतरावरील फतुलाबाद येथील बाबासाहेब वाल्मिक जगताप रा. फतुलाबाद ता. गंगापुर जि छत्रपती संभाजीनगर याचे घरी देखील 29 मे रोजीचे रात्री दरम्याने ते व त्याची पत्नी मुख्य दरवाज्याला कडी लावून झोपले असताना अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाज्याची कड़ी उघडुन घरात प्रवेश करुन त्याचे स्वयंपाक घरातील डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिणे व रोख रक्कम चोरून नेले त्याचे वर्णन खालील प्रमाणे-
1) 40000/- आठ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत 2) 22500/-साडे चार ग्रॅम वजनाची सोन्याची भुट्टो 3) 15000/-तीन ग्रॅम वजनाची सोन्याचे कानातले वेल 4) 3000/- रोख रक्कम ज्यात 100रु दराच्या 30नोटा. असा एकुण -80 हजार 500 रुपयांचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्याने दि. 29 मे रोजीचे रात्री १ ते दि.30 मे रोजी पहाटे 04.30 वा.घराचे किचनचे दरवाज्याचे कड़ीकोडा तोडुन आत प्रवेश करून दोन लोखंडी कोठ्या व एक लोखंडी पेटी घरातून चोरुन नेवुन त्यापैकी एका कोठीमध्ये एका स्टील च्या डब्यामधील ठेवलेला वर नमुद वर्णनाचा सोन्याचा व चांदीच्या वस्तु व रोख रक्कम कोठीचे लॉक तोडून एकूण 6 लाख 77-किमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम चोरुन नेला आहे. तसेच घरापासुन अंदाजे एक कि.मी अंतरावरील फतुलाबाद येथील बाबासाहेब वाल्मिक जगताप याचे घरातील एकुण 80500/-रु. कि.चा मुद्देमाल व रोख रक्कम असा एकूण 7,57,500/- असा मुद्देमाल व रोख रक्तम चोरून नेल्या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात दौलताबाद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!