शेतकऱ्यांचे पशुधन, चारा पाण्यावाचून विक्री होता कामा नये – आमदार प्रशांत बंब ; खोजेवाडी येथे रामनवमीच्या मुहूर्तावर स्व खर्चातून महाराष्ट्रातील पहिली चारा छावणी सुरू.

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील खोजेवाडी येथे आमदार प्रशांत बंब यांनी मित्रांच्या मदतीने पहीली चारा छावणी रामनवमीच्या मुहूर्तावर सुरू केली.
दुष्काळाच्या झळा सर्वत्र पसुर लागल्या आहेत मनुष्य त्या झळा सोसू शकतो परंतु पशुपक्षी ते सोसु शकत नाही. त्यासाठी आमदार प्रशांत बंब यांनी व मित्रांच्या सहकार्याने चारा छावणी रामनवमीच्या मुहूर्तावर सुरू केली असून गंगापूर खुलताबाद मतदारसंघातील शेतकऱ्यांनी चारा, पाण्यावाचून आपले पशुधन विक्री करु नये असे आवाहन आमदार प्रशांत बंब यांनी केले.

गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी येथे आमदार प्रशांत बंब यांनी शासनाच्या परवानगीची वाट न पाहता वैयक्तिक स्वखर्चाने महाराष्ट्रातील पहिली चारा छावणी १७ एप्रिल रोजी बुधवार सुरू केली त्यावेळी ते बोलत होते.
लासुर स्टेशन येथील कर्णावट यांच्या मालकीची खोजेवाडी येथे पत्रा कंपनी असून त्याच परिसरात तीन मोठं मोठी पत्र्याची शेड उभा केली आहेत. त्या पैकी पहिल्या शेड मध्ये सध्या ६५० ते ७०० पशुधनाची व्यवस्था करण्यात आली असून त्यांना चारा, कुट्टी पाणी आदीची व्यवस्था करण्यात आली आहे तर दुसऱ्या शेड मध्ये शेतकऱ्यांची जेवणाची, राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुढे बोलताना बंब म्हणाले की या चारा छावणीत सी सी टीव्ही कॅमेरे राहणार असून त्याची लिंक शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. म्हणजे शेतकरी छावणीत आला नाही तरी त्याच्या पशुधनाला दोन वेळचा चारा दिला जातो की नाही हे घर बसल्या पाहता येणार आहे. त्याच बरोबर मुक्कामी असणाऱ्या शेतकऱ्यांना कीर्तन, भजनाच्या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल अशी देखील व्यवस्था पुढील काही दिवसात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले याच ठिकाणी मतदारसंघातील एकाच छताखाली पाच हजार पशुधनाची राहण्याची व चाऱ्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चारा छावण्या सुरू करण्यासाठी शासनाची परवानगी मिळो अथवा न मिळो जो पर्यंत शेतकऱ्यांची आपले पशुधन घरी नेण्याची इच्छा होणार नाही तो पर्यंत चारा छावणी सुरू ठेवणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
दरम्यान यावेळी परिसरातील शेतकरी, भाजप पदाधिकारी, तालुका अध्यक्ष रवी चव्हाण, गोपाल वर्मा, रज्जाक पठाण, कृष्णकांत व्यवाहारे, बाजार समिती सभापती भाऊसाहेब पदार , संचालक, लोकप्रतिनिधी, पशु पालक , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!