सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे,पिकविमा, कांदा अनुदान मंजूर शेतकर्याच्या याद्या जाहीर करा नसता ३० जुन रोजी “गनीमी कावा निषेध आंदोलन”

*गंगापूर (प्रतिनिधी)सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे,पिकविमा, कांदा अनुदान मंजूर शेतकर्याच्या याद्या जाहीर करा नसता ३० जुन रोजी “गनीमी कावा निषेध आंदोलन”*

शेतकरी कृती समितीचे इंजी महेशभाई गुजर व टेंभापुरी कृती समितीचे अध्यक्ष राहुल ढोले पाटील यांनी १९ जुन २०२३ रोजी तहसीलदार सतिश सोनी व कृषी अधिकारी गंगापूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गंगापूर तालुक्यातील डोणगाव, तुर्काबाद, शेंदुरवादा, भेंडाळा, वाळुज मंडळातील सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीस पाञ शेतकरी यादी ,पंतप्रधान फसल बिमा योजना खरिप २०२२-२३ पिक विमा मंजूर झालेल्या शेतकर्याची यादी, कांदा उत्पादक अनुदान शेतकरी यादी दि २९ जुन पर्यंत जाहीर करावी नसता दि ३० जुन २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता गणीमी कावा निषेध आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
त्याच प्रमाणे गंगापूर तालुक्यातील मातोश्री ग्रामसंमृध्दी पाणंद रस्ते अंतर्गत देर्हळ रस्ता जिते वस्ती माळीवाढगाव कामाला मंजुर मिळाली आहे किंवा कामे सुरू आहेत,त्या रस्ताचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे. तसेच झालेल्या इतर कामाची तपासणी करण्यात यावी.टेंभापुरी येथिल सिंचन वसाहत मध्ये झालेल्या वृक्ष तोडी करणार्या संस्थेची मन्यता रद्द करुन अध्यक्षावर वृक्ष तोडी कलाम अंर्तगत गुन्हा दाखल करावा.धामोरी बु ता. गंगापूर च्या १५ किलोमीटरच्या परिसरात मागील एक महिन्यापासून बिबट्याने अनेक गाई बकरी कुत्रा हल्ला करुन शेतकरी वर्गाच नुकसान करत असून बिबट्यास व रानडुकरांचा बंदोबस्तासाठी आपण तातडीने उपाययोजना करणे बाबत.दहेगाव टेंभापुरी अंतापुर गुरुधानोरा भगतवाडी हर्सुली तळप्रिपरी माडवा शिवपुर Sh 215 Road M.d.r रोड वर सोम अॅटो कंपनी गट नं 78 मध्ये केलेल अतिक्रमण काढणे बाबत निवेदन टेंभापुरी कृती समितीचे अध्यक्ष राहुल ढोले व शेतकरी कृती समितीचे इंजी महेशभाई गुजर यांच्या वतीने देण्यात आले.
ज्या शेतकर्यांना अतिवृष्टी अनुदान, सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान, पिक विमा, कांदा अनुदान मिळाले नसेल त्यांनी दि ३० जुन २०२३ रोजी गनीमी कावा निषेध आंदोलनात सहभागी व्हावे असे अहवान करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!