श्री क्षेत्र आळंदी येथे वारकऱ्यांवर लाठी चार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे त्वरित निलंबन करावे.

श्री क्षेत्र आळंदी येथे वारकऱ्यांवर लाठी चार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे त्वरित निलंबन करावे.छावा संघटनेची मागणी
गंगापूर (प्रतिनिधी)महाक्षेत्र आळंदी येथून आज माऊली वैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाच्या वेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठी चार्ज केल्याचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झालेला आहे.
या प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री त्यांनी तात्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

शिल्लेगाव पोलीसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मंदिराच्या प्रांगणात काही प्रमुख दिंड्यांना प्रवेश दिलेला होता पण इतरही काही वारकरी आत मध्ये जात असताना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याची माहिती घटनास्थळी असणाऱ्या वारकऱ्यांनी दिलेली आहे वारकऱ्यांवर लाठी चार्ज करणे ही बाब अतिशय निंदनीय आहे. जमावाला आवर घालण्याच्या करिता पोलिसांना लाठीचार्ज करण्याऐवजी त्या ठिकाणी समजूतदारपणाने हे प्रकरण थांबवता आले असते पण उभ्या महाराष्ट्राला शांततेचा शिस्ततेचा संदेश देणाऱ्या वारकऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा विचार न करता लाठीने हल्ला करणे ही बाब मन हेलावून टाकणारी आहे पुरोगामी महाराष्ट्रासाठी देखील ही लाजिरवाणी बाब आहे.
झुंजार छावा संघटनेच्या वतीने .मुख्यमंत्री व .गृहमंत्री यांना विनंती करतो की. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला व ज्या पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठी चार्ज केला त्या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून योग्य तो न्याय करावा अन्यथा महाराष्ट्रातील सर्व वारकरी संघटना एकत्र घेऊन झुंजार छा वा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करणार व होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी हि प्रशासन यांची असणार असा इशारा झुंजार छावा संघटनामराठवाडा युवा अध्यक्ष कृष्णा पाटील पऱ्हाड यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!