विवाहितेला धमकी देऊन बलात्कार एकाविरोधात गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.


गंगापूर (प्रतिनिधी) घरात झोपलेल्या विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करणाऱ्याच्या विरोधात गंगापुर पोलिसात मंगळवारी २५ जुन रोजी सायंकाळी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील नेवरगांव येथील २२ वर्षीय पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आपण सोमवारी २४ जुन रोजी घरात झोपलेली असताना रात्री साडे अकराच्या सुमारास गावातील आरोपी रोहित संजय दुशिंग याने फिर्यादीच्या घरात बळजबरीने घुसून फि-यादीवर बलात्कार केला व आरडाओरड केल्यास अथवा कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली;याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी रोहित संजय दुशिंग(वय,२६) विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे; या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी कुंभारे या करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!