माहेरच्यांकडुन मोटारसायकलसाठी तगादा लावल्याने २६ वर्षांच्या विवाहीतेने विष प्राशन करून जीवन संपविले .शिंगी येथील घटना


गंगापूर (प्रतिनिधी) माहेराहून मोटारसायकलसाठी पैसे घेऊन ये अशी मागणी करत शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून एका २६ वर्षांच्या विवाहीतेने विष प्राशन करून जीवन संपविले.ही घटना गंगापूर तालुक्यातील शिंगी येथे १९ मे रोजी दुपारी दोन वाजता घडली.या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील शिंगी येथील रहिवासी शाहीन सद्दाम शेख वय २६ वर्ष या विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असून या प्रकरणी विवाहितेच्या नातेवाईकांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की १९ मे रोजी दुपारी २ वाजेपुर्वी मुलगी शाहिन सदाम शेख हिला तिचा पती सद्दाम लतिफ शेख , सासु सुगराबी लतिफ शेख , सासरा- लतिफ गुलाब शेख , जेठ ताहेर लतिफ शेख व जेठाणी अलमास ताहेर शेख. सर्व रा. शिंगी ता गंगापुर यांनी आपसात संगनमतकरुन मी मुलीला लग्नामध्ये हुंडा दिला नाही. व जावई सद्दाम याला विद्युत वितरण कंपनी (M.S.E.B) मध्ये कायमस्वरुपी नोकरी लागल्याने तिला माहेराहुन मोटरसायकल व पैसे घेवुन येणेचे कारणावरुन गेल्या सहा महिन्यापासुन शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याने तिने १९ मे रोजी काहीतरी विषारी औषध प्राशन केले आहे. तिच्या मरणास वरील सर्व जण कारणीभुत असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे .
या प्रकरणी मयत विवाहिता शाहीन सद्दाम शेख चे वडील मुसा गफुर शेख राहणार प्रतापपुर वाडी यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये पती, सासू,सासरे,भाया, जावु यांच्या विरोधात भादवी कलम ३०४ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पती सासरा व भाया यांना पोलिसांनी अटक केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अझहर शेख हे करत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!