बिबट्याचा चार तास थरार…बकरीवर मारला ताव..वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे बिबट्या गोठ्यातुन पळाला… शेतकऱ्यांनी अधिका-यांना धारेवर धरले…

बिबट्याचा चार तास थरार…
बकरीवर मारला ताव.*वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे* बिबट्या गोठ्यातुन पळाला शेतकऱ्यांनी अधिका-यांना *धारेवर धरले*
गंगापूर (प्रतिनिधी)बक-याच्या गोठ्यात घुसलेल्या बिबट्याने बकरीचा फडशा पाडुन ताव मारला.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडण्यासाठी प्रयत्न न करता बघ्यांची भुमीका घेत नागरिकांना हाकलून लावल्याने चार तासानंतर बिबट्या जाळी खालुन निघून गेल्याने अधीका-यांना धारेवर धरले.

गंगापूर तालुक्यातील नरहरी राझंणगाव शिवारातील सुकदेव म्हस्के यांच्या शेतात बक-यासाठी बांधलेल्या जाळीच्या गोठ्यात उघड्या असलेल्या दरवाजातुन२८ जुलै रोजी रात्री दहा वाजता बिबट्या घुसला व त्यांने एका बकरीचा फडशा पाडुन ताव मारत असताना बक-याच्या आवाजाने म्हस्के यांनी बिबट्याला पाहिले त्यांनी गोठ्याचे दार बंद करून कुलुप ठोकले .या घटनेची माहिती वनविभागाला कळविले वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी हे दोन तासानंतर घटनास्थळी आले परंतु त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी काहीच उपाययोजना न करता उपस्थित जमावाला पोलिसांच्या मदतीने हाकलून लावले व आपण बिबट्याला गोठ्याचा दरवाजा उघडुन सोडुन देऊ असे सांगितले परंतु शेतकऱ्यांनी बिबट्याला पकडुन घेऊन जाण्याची विनंती केली तरीही वन विभागाच्या अधिका-यांनी बिबट्याला न पकडता पहात राहीले रात्री २ वाजता बिबट्या जाळीच्या खालुन निघून गेला या घटनेमुळे संतप्त शेतकऱ्यांनी अधिका-यांना धारेवर धरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!