बाबरगांव ग्रामपंचायतिच्या उपसरपंच पदी सोनाली प्रदीप सावंत बिनविरोध

बाबरगांव ग्रामपंचायतिच्या उपसरपंच पदी सोनाली प्रदीप सावंत बिनविरोध
गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील बाबरगांव ग्रामपंचायतिच्या उपसरपंच सुनंदा कृष्णा दंडे यांनी स्वखुशीने राजीनामा दिल्याने रिक्त पदाच्या झालेल्या निवडणुकीत सोनाली प्रदीप सावंत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली .यावेळी मंडळ अधिकारी बाळासाहेब जाधव यांनी अध्यासी अधिकारी म्हणून काम बघितले, यावेळी ग्रामसेवक राहुल चराटे , तलाठी कैलास वने , पोलीस पाटील यमुना सावंत यांनी त्यांना सहाय्य केले . यावेळी सरपंच शोभाताई लिंबोरे , माजी उपसरपंच सुनंदा दंडे , रामनाथ तुपे , रामनाथ जाधव , छायाबाई दंडे तसेच नारायण सातपुते आदी ग्रामपंचायतिचे सदस्य निवड प्रकियेत सहभागी झाले होते . याप्रसंगी राजेंद्र सावंत , शिवाजी सावंत, चांगदेव दंडे ,हरिश्चंद्र सावंत, कृष्णा दंडे ,दत्तू लिंबोरे, प्रदीप सावंत, दादासाहेब दंडे,अशोकराव सावंत ,संजय तुपे,महेश सावंत,सुभाष तुपे, दत्तू सातपुते, किशोर सावंत, अण्णासाहेब सावंत, सोमनाथ बोरुडे, देविदास सावंत ,गणेश दंडे ,साहेबराव दंडे आदींनी नवनिर्वाचित उपसरपंच सोनाली सावंत यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!