प्रशासनाची रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची वाट न पाहता शहरातील सुजाण नागरिकांनी जनहितासाठी खड्डे बुजविण्याचे काम करावे-संदीपकुलकर्णी…..अँब्युलन्स हेल्प रायडर्सने सेव्हन हिल्स येथे बुजविले जीवघेणे खड्डे

प्रशासनाची रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची वाट न पाहता शहरातील सुजाण नागरिकांनी जनहितासाठी खड्डे बुजविण्याचे काम करावे-संदीप कुलकर्णी
अँब्युलन्स हेल्प रायडर्सने सेव्हन हिल्स येथे बुजविले जीवघेणे खड्डे

छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी): अँब्युलन्स हेल्प रायडर्स च्या वतीने खड्डे बुजवा मोहीम हाती घेऊन २२ ऑगस्ट रोजी सकाळी सेव्हन हिल परिसरात जीवघेणे खड्डे बुजविण्यात आले..

मागच्या अनेक दिवसापासून आपण सर्वजण बघत आहोत जालना रोडवर सेव्हन हिल चौकातील गजानन मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला ३ ते ४ मोठे जिवघेणे खड्डे झालेले आहेत. पावसाळ्यात त्याच खड्डयात पाणी साचून रात्री हे खड्डे वाहन चालकांना दिसेनासे झाले. यामुळे अनेक वाहनचालकांचे अपघात होतात. प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. एकंदरीत शहरातील रस्ते अनाथ झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाची वाट न पाहता अँब्युलन्स हेल्प रायडर्स या सामाजिक संस्थेने २२ ऑगस्ट रोजी पुढाकार घेतला. त्यांना संतोष जोशी यांनी खड्डे बुजवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य ऊपलब्ध करून देत हेल्प रायडर्सला सहकार्य केले. २२ ऑगस्ट रोजी संस्थेने स्वतः सकाळी ७ वाजता श्रमदान
करत सेव्हन हील चौकातील ३-४ मोठे खड्डे मुरूम व खडी टाकत तात्पुरत्या स्वरूपात बुजवले. यावेळी अँब्युलन्स हेल्प रायडर्स संस्थेने प्रशासन कधी काम करेल याची वाट न पाहता आपण सुजाण नागरिक म्हणून पुढे येत अशी जनहिताचीं काम करावी त्याचप्रमाणे जीवघेणा प्रवास करण्यापेक्षा सर्वांनी पुढाकार घेउन शहरातील रस्त्यांवर दिसेल ते खड्डे बुजविण्यात यावे. असे आवाहन करून अपघात कमी होण्यास मदत मिळेल. अशी जनजागृती केली. उपक्रमात संस्थेचे संदीप कुलकर्णी, भूषण कोळी, देवा मनगटे, निखिल गाडेकर, प्रसाद कस्तुरे, शारदा पडवळे, शामसुंदर देशपांडे, मुकेश गाडेकर, रजनी नागवंशी, आनंद सावदेकर, शारदा पडवळे, मीनल घुमरे, किरण शर्मा, दीपक साळवे, पवन भिसे, ज्युनिअर देवा मनगटे, ज्ञानेश्वर डोळे आदींनी खड्डे बुजविण्याचे काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!