ट्युशनच्या नावाखाली गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना; संशयावरून गंगापूरात एक उर्दू शाळेच्या शिक्षकाला नागरिककडून बेदम चोप!


गंगापूर(प्रतिनिधी) शहरातील एका उर्दू शाळेच्या शिक्षकांने ट्युशनच्या नावाखाली विद्यार्थिनींना घरी नेऊन त्यांचे शोषण केल्याच्या संशयावरून ! काही नागरिकांनी एका हाॅटेलमध्ये बेदम चोप दिला.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर शहरातील एक उर्दू प्राथमिकशाळा व महाविद्यालयात असणाऱ्या प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या शिक्षकाने
ट्युशनच्या नावाखाली शिक्षण घेत असलेल्या तिन चार विद्यार्थिनींना शाळा सुटल्यावर स्वतःच्या कारमध्ये बसवून घरी घेऊन जात होता.त्या मुलींना काहीतरी अमिश दाखवून त्यांचे लैंगीक शोषण करत होता अशी कुणकुण काही पालक व नागरीकांना लागली होती त्यामुळे नागरिकांनी पाळत ठेवून संशय बळावल्याने तिन ते चार दिवसांपुर्वी शहराबाहेरील एका हाॅटेलमध्ये या शिक्षकाला येथेच्छ मार दिला त्यांनतर हा शिक्षक बो-याबिस्तर बांधून पळून गेला असल्याची चर्चा शहरातील चौकाचौकात नागरिकांमध्ये सुरू आहे
गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना असुन अशा शिक्षकांवर कारवाई करुन निलंबित करण्याची मागणी पालक वर्गातुन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!