गोळी लागून जखमी झालेल्या बाळाची प्रकृती स्थिर असुन आरोपी बापाला पोलीसांनी केली अटक आरापीला एक दिवस पोलिस कोठडी.. गंगापूर शहरात गावठी कट्टे येतातच कशे?

गोळी लागून जखमी झालेल्या बाळाची प्रकृती स्थिर असुन आरोपी बापाला पोलीसांनी केली अटक.. आरापीला एक दिवस पोलिस कोठडी..

गंगापुर (प्रतिनीधी) गावठी कट्ट्यातुन गोळीबार करुन मुलास जखमी केल्या प्रकरणी प्रकरणी राहुल राठोड याला पोलिसांनी अटक करुन न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत
गंगापूर शहरातील अहिल्यादेवीनगर परिसरात भाडेकरू कुटुंबाच्या घरात गावठी बंदुकीची गोळी लागून अडीच वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेदरम्यान घडली.आर्यन राहुल राठोड, असे जखमी झालेल्या मुलाचे नाव असून त्याच्या कपाळावर गोळी लागली होती सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असुन त्याची प्रकृती प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती .या प्रकरनी गंगापुर पोलीस स्टेशनला आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गंगापुर पोलीसानी २५ ऑगस्ट रात्री एक वाजता राठोड याला अटक केली आहे.
पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर शहरातील नवीन बसस्टँड रोडवर अहिल्यादेवी नगरमधील नवनाथ अंबादास भराड यांच्या घरात भाड्याने राहत असलेल्या राहुल कल्याण राठोड (वय २९ वर्षे) व संगीता
राहुल राठोड हे नवरा बायको अडीच वर्षाचा मुला सोबत किमान चार महिन्यापासून या ठिकाणीं राहतात.राहुल हा शहरातील खाजगी फायनान्स कर्ज वितरण करणाऱ्या बँकेत कामाला असून शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातून अचानक जोराचा आवाज आला होता.त्यानंतर राहुल व त्याची पत्नी जखमी मुलगा आर्यनला घेऊन येथील विठाई दवाखान्यात गेले या घटनेची माहिती मिळताच पोलिस
निरीक्षक सत्यजीत ताईतवाले,उपनिरीक्षक दीपक औटी,अमोल कांबळे,राहुल पगारे,विजय नागरे,संदीप घुसिंगे,नारायण दुलत,अभिजीत डहाळे,विजय नागरे,तेजसिग राठोड, कैलाश राठोड धाव घेत घराची घराची झडती घेतली तेव्हा पोट माळ्यावर एक गावठी कट्टा व तीन गोळ्या पैकी दोन गोळ्या झाडल्याचे समोर आले.घरात ठीक ठिकाणीं रक्ताचे डाग पडले होते.या प्रकरनी गंगापुर पोलीस स्टेशनला कलम ३,२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी राहुल कल्याण राठोड याला छत्रपती संभाजीनगर येथुन अटक करण्यात आली . त्याला येथील न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक औटी हे करत आहे.

बँक कर्मचाऱ्याकडे कट्ट्याची गरज काय व कट्टा कुठून आला ?

भाडेकरू म्हणून राहणाऱ्या व साधा खासगी बँकेत वसुली कर्मचारी असलेल्या राहुल राठोड याच्याकडे कट्टा कुठून आला? त्याची यापूर्वीची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी
आहे का? घरात गोळीबार नेमका कोणत्या कारणामुळे झाला.गोळीबारात आर्यनच्या डोक्याच्या एकदम मधोमध गोळी कशी लागली,असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून
पोलिस तपास करीत आहेत.

आरोपीने घटणा घडल्यावर कट्टा ठेवला लपवून

जखमी आर्यनला घेऊन राहुल व संगीता येथील विठाई दवाखान्यात घेऊन गेले,तेव्हा संगीता मुलाला गोळी लागली,असे म्हणून जोरजोरात रडत असल्याचे नागरिकांनी ऐकले.तेव्हा आपले पितळ उघडे पडेल या भीतीने राहुल राठोड हा मुलाला
दवाखान्यात दाखल करून घाईघाईने घरी आला व त्याने कट्टा पोटमाळ्यावर लपवुन घराला कुलूप लावून पुन्हा दवाखान्यात जाऊन आर्यनला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले त्याच्या कपाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!