गंगापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलची विहीर झुकत चालल्याने ढासळण्याच्या मार्गावर.. रात्री तडे पडुन दहा फुटाचा स्लॅब कोसळला

गंगापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलची विहीर झुकत चालल्याने ढासळण्याच्या मार्गावर.. रात्री तडे पडुन दहा फुटाचा स्लॅब कोसळला
गंगापूर (प्रतिनिधी) नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे गंगापूर शहराला पाणीपुरवठा पुरवठा करणा-या गोदावरी नदीवरील विहीरीला तडे जावुन नदीच्या बाजूला झुकल्याने विहीरीवर जाणारा दहा फुटाचा स्लॅब खाली पडला सुदैवाने यात काही अपरीत घडले नाही.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गोदावरी नदीवरील अंमळनेर शिवारातील (जॅकवेल) विहीरीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे हा गाळ काढल्यामुळे ही बांधलेली विहीर नदीच्या आतमध्ये झुकत चालली आहे २९ जुलै रोजी आज पहाटे एक फुट झुकल्यामुळे विहीरीवर जाण्यासाठी बनविलेल्या रॅम्प सिमेंट रस्त्याचा स्लॅब पंचवीस फूट खाली कोसळला आहे सध्या या रस्त्यापासून पाच ते दहा फुटाचे अंतर झाले असल्याने विहीरीवर जाता येत नाही ही विहीर कधीही ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे याकडे अधिकारी यांनी त्वरित लक्ष देवून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!