गंगापूर शहरात बनावट नोटा आढळल्याने खळबळ. शहरातील राष्ट्रीयीकृत बँकेच्या एस बी आय ग्राहक सेवा केंद्रात सापडल्या पाच हजारांच्या बनावट नोटा


गंगापूर प्रतिनिधी: शहरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या एस बी आय ग्राहक सेवा केंद्रात पाच हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेतील संशयितावर गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीयीकृत बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एस बी आय ग्राहक सेवा केंद्रात एका नागरिकाने २० हजार रुपयांची रक्कम जमा केली. त्याच्याकडून पाचशे रुपयांच्या चाळीस नोटांचे बंडल देण्यात आले होते. सेवाकेंद्र चालकाने या नोटा मशीनमध्ये तपासल्या तेव्हा त्या खोट्या असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ दिलीप भागवत यांना माहिती दिली असता त्यांनी पोलीस तुळशीराम गायकवाड व जाधव यांनी घटनास्थळी पाठवले असता त्यांनी केंद्र चालकाला व संबंधित ग्राहकाला गंगापूर पोलिस ठाण्यात नेले याबाबतची तक्रार दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. या बनावट नोटा आहे की ख-या तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!